फलटण : बेरड, बेडर, नायका, रामोशी या एकच जाती असुन या जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्रात शांततेत मोर्चे काढणार असून आम्हाला एसटी प्रवर्गात समावेश करावे अन्यथा आम्ही महाराष्ट्रात हिंसक मार्गाने आंदोलन करू, असे प्रतिपादन जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे केले.
फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. मोर्चामध्ये फलटणसह अनेक जिल्ह्यातील रामोशी समाज बांधव सहभागी झाले होते. पुढे बोलताना शितोळे म्हणाले की, मागील वर्षी सरकारने उमाजी नाईक यांची जयंती शासकीय केली. एसटी आरक्षणाचा मुद्दा अजुनही अंमलात आणलेला नाही. रामोशी समाजाला दरोडेखोर समाज म्हणुन जो डाग लागला होता तोही सरकारने काढून टाकावा व बेरड, बेडर, नायका, रामोशी या जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा. बेरड, बेडर, नायका, रामोशी या जातींना इतर राज्यात अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात समाविष्ट केले आहे. परंतु महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रामोशी समाज असतानाही अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गात समावेश का केला नाही. आजही महाराष्ट्रात बेरड, बेडर, नायका, रामोशी यांचे महाराष्ट्रात रोटी बेटी व्यवहार होत आहेत. या समाजाच्या चालिरिती रूढी परंपरा ह्या त्याच आहेत मग रामोशी समाजाचा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात समावेश का नाही, असा घनाघाती सवाल त्यांनी यावेळी राज्यसरकारला केला. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, मानवशास्त्रिय विचारवंतांनी बेरड, बेडर, नायका, रामोशी या एकच जाती आहेत, असे सांगितले आहे. मग आमचा या तत्सम जाती-जमातीमध्ये समावेश का होत नाही? यासाठी आम्ही रामोशी समाज बांधव रस्त्यावर उतरून 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करणार आहोत.
तहसिलदार विजय पाटील यांना रामोशी समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीचे निवेदन जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बोडरे, उपाध्यक्ष मेजर भारत जाधव, माजी मार्केट कमिटी संचालक बाळासाहेब मदने, संजय जाधव, अरविंद जाधव, बबनराव खोमणे, शस्त्रुघ्न जाधव, ऍड राहूल मदने, तालुकाध्यक्ष धनाजी जाधव, युवक अध्यक्ष अक्षय जाधव, शिवाजी जाधव, अनिल शिरतोडे, गुलाबराव भंडलकर, राजाभाऊ शिरतोडे, लालासाहेब मसुगडे, नितिन मदने, डॉ. सुभाष गुळवे, गंगाराम जाधव, बापुराव शिरतोडे, शामराव मदने, रामदास मदने, लाला आडके आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |