वाई : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून आज चोरट्यांनी पादचारी वृद्धेच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने धूम स्टाईल भरदिवसा लांबवले. शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या धोम कॉलनीत सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून चोरट्यांनी महिन्याभरात लाखो रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला आहे. यामुळे वाई पोलिसांची अक्षरशः झोप उडाली आहे.
शशिकला सुभाष इंगुलकर ( वय ६९ ) या वृद्ध महिला धोम कॉलनीतील शासकीय निवासस्थाना पासून काही अंतरावर बलकवडी कार्यालयाच्या दिशेने पायी जात असताना समोरून तोंड बांधून पायी चालत आलेल्या तरुणांने इंगुलकर यांची नजर चुकवून त्याचा गळ्यातील मंगळसूत्र व अन्य सोन्याचे दागिने जोरात हिसकावले, यावेळी गळ्याला हिसका बसल्याने इंगुलकर याने उजव्या हाताने गळ्यातील दागिने घट्ट पकडून ठेवले यामुळे अर्धे मंगळसूत्र तुटून त्याच्या हातात राहिले. मात्र गळ्यातील अन्य दोन सोन्याचे ऐवज त्या चोरट्याने हिसकावून पुढे थांबलेल्या तरुणांच्या दुचाकी बसून तो पळून गेला. सत्तर ते ऐशी हजारांचे अंदाजे तीन तोळे पेक्षा जास्त दागिने चोरट्यांनी भरदिवसा धूम स्टाईलने चोरून नेले. इंगुलकर या रोज सांयकाळी त्या परिसरात फिरायला येत असतात, चोरट्यांनी पाळत ठेऊन चोरी केली आहे. चोरी झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर प्रांत, तहसीलदार, मुख्याधिकारी याची निवासस्थाने आहेत, या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. अश्यावेळी चोरट्यांनी हे धाडस केले आहे. रात्री उशिरा तक्रार घेण्याची प्रक्रिया वाई पोलीस ठाण्यात सुरू होती. घटनास्थळी पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी भेट दिली.
दरम्यान आणखी एका चोरीच्या घटनेने शहरात घबराट पसरली आहे, विशेष महिनाभरात झालेल्या सर्व चोऱ्या या दिवसा झाल्या आहेत. पोलीस अधिकारी नवीन, एक- दोन सोडले तर पोलीस कर्मचारी ही नवीन. यामुळे येथील गुन्हेगारी कारवाया व माहिती देणारे खबरे याची अद्याप माहिती होत नसल्याने चोरट्यांपर्यंत पोहचणे अवघड होऊन बसले आहे. पोलीस निरीक्षक खोबरे याना चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगळी रणनीती अवलंबावी लागेल. अन्यथा चोरटे सळो की पळो करून सोडतील.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |