दहिवडी : माण पंचायत समितीच्या विविध खात्यांमध्ये अधिकारी वर्गांचा रिक्त पदाने बट्ट्याबोळ झाला आहे. तालुक्यावर निसर्गाने दुष्काळी शिक्का ठोकला असला तरी शासनाने अघोषित असा अधिकाऱ्यांचा दुष्काळ असा शिक्का मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
माण पंचायत समितीच्या शिक्षण, पशुसंवर्धन, महिला बाल विकास प्रकल्प या विभागात कारभारीच नाहीत मग त्यांचा गाडा कसा चालायचा हा संशोधनाचा विषय झाला आहे.
शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त कारभार शिक्षण विस्तार अधिकारी सोनाली विभूते या सांभाळत आहेत. त्यांच्याकडे मलवडी चे विस्तार अधिकारी पद आहे. माण तालुक्यातील शिक्षण विभागाला कारभारी तर नाहीच पण दहिवडी सोडले तर इतर शाळांवर मुख्याध्यापक सुद्धा नाहीत अशी शिक्षण विभागाची फरपट सुरू आहे.
दुष्काळी माण तालुक्याला सरस्वतीचा वरदहस्त असल्याने राज्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाच्या जोरावर अधिकारी वर्ग मोठ्या पदावर असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी पद गेल्या चार वर्षांपासून रिक्त आहे. विस्तार अधिकारी यांची पाच पदे मंजूर असताना दोनच पदावर अधिकारी कार्यरत आहेत त्यातील एक जण अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. केंद्रप्रमुखांची 19 पदे मंजूर आहेत त्यापैकी 6 जण कार्यरत असताना 1 जण सेवनिवृत्तीच्या मार्गावर आहेत. जिल्हापरिषदेच्या 269 प्राथमिक शाळा सुरू आहेत, त्या शाळांना 26 मुख्याध्यापक पदे मंजूर असली तरी दहिवडी वगळता 25 शाळांना मुख्याध्यापक नाहीत.
महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेही पद रिक्त आहे याही खात्याचा कारभार अधिकार्याविना सुरू आहे. माण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकीय अधिकारी पदासह श्रेणी 1ची सहा पदे रिक्त असून त्यापैकी दोन पदावर अधिकारी कार्यरत असले तरी त्यातील एक जण घरगुती अडचणीने रजेवर गेले आहेत. दहिवडी, मोही, म्हसवड या मुख्य ठिकाणी श्रेणी 1 दर्जाचे अधिकारी पदावर नाहीत, तर श्रेणी 2 चे मार्डी येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे.
माण पंचायत समितीच्या अनेक विभागात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. तत्कालीन पशुसंवर्धन दुग्ध,मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. सत्ता असताना त्यांना जमले नाही त्यांचे केवळ आश्वासनच राहिले आहे. आताचे या विभागाचे नवीन येणारे मंत्री कोणती ठोस भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, त्यामानाने पशुधनाच्या आरोग्य नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा तोकडी पडत आहे .
रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार
माण पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त झाली आहेत, ती भरण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यासंदर्भात माण पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ठराव करण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे, ही पदे शासनाने तातडीने भरावीत.
रमेश पाटोळे- सभापती माण पंचायत समिती, दहिवडी.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |