06:34pm | Apr 23, 2018 |
सातारा : (अजित जगताप) दुष्काळाची झळा सहन करत खंबीरपणे उभा राहिलेल्या माण- खटाव वासीयांनी हाती कुदळ फावडे घेऊन दुष्काळा विरोधी लढा उभारला आहे. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावकऱ्या सोबत अनेकजण सहभागी होत आहेत. त्यात आता सेवानिवृत्ती वरिष्ठ अधिकारी यांचा सहभागाने आमदारकीच्या उंबरठ्यापर्यंत धाव घेतली अशी चर्चा सुरू झाली आहे.
माण-खटाव तालुक्यातील जनतेने दुष्काळ हे आवाहन समजून गेली आठ वर्षे स्वयंस्फूर्तीने लढा दिला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. शरद पवार, जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी, आ. जयकुमार गोरे, माणदेशी फौंडेशन व स्वयंसेवी संस्थांनी काम केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दुष्काळ आटला आहे, पण, पूर्णपणे नष्ट होऊ शकला नाही. सद्य परस्थिती वॉटर कप स्पर्धेच्या युगात 85 गावात युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे. सुमारे पंधरा हजार ग्रामस्थ श्रमदानातून गावातील माळरानात चर, पाझर तलाव, नाला, बांध घालून घाम पाझरत आहेत. या सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी अंगणवाडी सेविका पासून ते सेवानिवृत्ती वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नववधू वर शिवारात श्रमदान करण्यासाठी वेळ देत आहेत.
सध्या कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे अनुक्रमे लोधावडे(माण)निढळ(खटाव)हे शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी यापूर्वी आपल्या गावात मार्गदर्शन करून राज्यशासनाच्या पुरस्कारही प्राप्त केला आहे. याच बरोबर जिल्हा परिषदेचे अभियंता संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष सुनील पोरे यांनी सुद्धा ग्रामस्थांच्या सोबत श्रमदानात सहभाग घेतला आहे. त्यामुळे माण-खटाव तालुक्यात ज्या गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी माण -खटाव तालुक्याला भेट दिली. एवढेच नव्हे तर 15 मिनिटाच्या प्रवासात त्यांनी साडेसहा कोटी रुपयांची मदत गोळा केली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाऱ्यासारखी पसरवली. मुळातच राष्ट्रवादीची सत्ता असतानाही पंधरा वर्षात माण-खटावला एवढया मोठ्या प्रमाणात जिल्हा बँक व जिल्हा परिषद ने आर्थिक मदत केली नाही. उलट जेष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पाणी कुठून देणार?असा प्रतिप्रश्न केला होता. आता एक वर्षात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दुष्काळी भागातील राजकीय नेते मंडळी व सेवानिवृत्त काही अधिकारी यांच्या वारेमाप प्रसिद्धीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहिली आहे. सामान्य माणूस श्रमदान करीत आहेत त्याचे लक्ष फकत पाणी साठवून ठेवणे एवढेच आहे असे दिसत आहे.
माण-खटावचे राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, त्यांचे बंधू व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते शेखर गोरे, भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगावकर, मनसेचे धर्यशील पाटील, यांच्यासोबत सेवानिवृत्त काही अधिकारी यांनी सुद्धा आमदारकीची निवडणूक लढविण्यास तयारी सुरू केली आहे. पण, राजकारण ही प्रदिर्घ प्रक्रिया असून त्यात काहीही घडू शकते. याचा अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. तरीही माण-खटाव मतदारसंघात गोरे बंधूच एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतील किंवा त्या मध्ये कोणी इतर व्यक्ती आली तर दोन्ही बंधू समेट घडवू शकतात. असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकारणात सातारचे श्री. छ. उदयनराजे भोसले व आ शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराडचे जयंवतराव भोसले, यशवंतराव मोहिते प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर एकत्र आले होते. बोराटवाडीची गोरे बंधू सुद्धा विचारविनिमय करून निदान आमदारकीच्या निवडणुकीत एकत्र आले तर नवल वाटणार नाही. अशी अपेक्षा माण वासीयांनी आहे. सध्या गोरे बंधू यांना राजकीय अडचणीला तोंड द्यावे लागले आहे. घर का भेदी लंका धाये... हे माणच्या मातीत घडू नये अशी अनेकांची मनस्वी इच्छा आहे. तशी चर्चा शिवारात असली तरी त्याला अधिकृत घोषणा करण्यासाठी गोरे बंधू एकत्र आली नाहीत. तरीही त्यांचे काही जवळचे प्रतिनिधी दुष्काळ आटविण्यासाठी पुढाकार घेत आहेत ही सुखद अनुभव आहे.
आमदारकीच्या तोंडावर श्रमदानाच्या माध्यमातून काहींनी सुटाबुटात श्रमदान करीत असल्याची छबी दाखवून दिली आहे. त्यात आता सेवानिवृत्ती अधिकारी सुद्धा मागे नाहीत. एकूणच श्रमदानापेक्षा काहींना प्रसिद्धीसाठी मोबाईल, कॅमेरा व बॅटरी पॅकअप साहित्य घेऊन शिवारात हिंडावे लागत असल्याने अनेकांना त्या निमित्त चांगलाच रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे आमदारकीच्या हाती ढोल व वरिष्ठ अधिकारी यांच्या हाती कुदळ असे चित्र दुष्काळी भागात पाहण्यास मिळत आहे. त्याचा शिवारात अनेक प्रामाणिक साक्षीदार श्रमदान करून अनुभव घेत आहेत.हे मात्र खरे ठरले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |