01:05am | Jul 06, 2018 |
सातारा : सातारा नगरपालिकेतील आरोग्य विभागात कामाला लावतो असे सांगून 2 लाख 75 हजार रुपयांची दोघांनी फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुगंधा रमेश बिडलानी व विद्या गणेश बिडलानी (दोघे मूळ रा.कराड सध्या रा.केसरकर पेठ, सातारा) अशी संशयित दोन्ही महिलांची नावे असून त्या दोघी नात्याने सासू-सुन आहेत.
अमोल अशोक कडाळे (वय 36, रा.यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 डिसेंबर 2016 ते 9 एप्रिल 2018 या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. यातील संशयित सुगंधा बिडलानी या नगरपालिकेत कामाला होत्या मात्र त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यानुसार वारसाहक्काने त्यांचा मुलगा किंवा सून यांना नोकरी मिळण्याची नोंद आहे. तक्रारदार अमोल कडाळे यांची बिडलानी यांच्याशी ओळख आहे. ओळखीतून नोकरी लावण्याचा विषय झाला असता तक्रारदार अमोल कडाळे यांनी त्यांची पत्नी ज्योती कडाळे यांना पालिकेत नोकरी लावण्याचे ठरले.
सातारा नगरपालिकेतील आरोग्य विभागात कामाला लावतो, असे संशयित सासू व सुनेने त्यासाठी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. साडेतीन लाखापैकी तक्रारदार यांनी तब्बल 2 लाख 75 हजार रुपये दिले आहेत. पैसे दिल्यानंतरही नोकरीसाठी प्रत्यक्षात हालचाली झाल्या नाहीत. नोकरी लावली जात नसल्याने व दिलेले पैसे मागितल्यानंतर तेही परत करण्यास टाळाटाळ होवू लागली.यामुळे तक्रारदार यांनी नोकरी किंवा पैसे परत देण्याचा तगादा लावला.
तक्रारदार यांनी नगरपालिकेतून माहिती घेतल्यानंतर मात्र ज्या जागेवर नोकरी मिळणार होती त्या जागेवर नोकरीचा अर्ज आला असल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली. फसणूक झाल्याचे समोर आल्यानंतर अखेर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. दरम्यान, गेल्या चार महिन्यातील अशा पध्दतीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |