सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयातील (सिव्हील) क्लार्क अमित राजे याच्याविरुध्द लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार असतानाच मंगळवारी त्याने अटकपूर्वसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. याप्रकरणाची आता 9 रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, संशयित अमित राजे एसीबी विभागाला एकीकडे सापडत नसताना टप्प्याटप्प्याने घडणार्या या नाट्यमय घडामोडींमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमित राजे याने वाई येथील हॉस्पिटलला परवाना नुतनीकरणासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने एसीबी विभागात तक्रार दिली. अखेर चार दिवसांपूर्वी लाचेच्या मागणीप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच अमित राजे नाट्यमयरीत्या पसार झाला. यावेळी एसीबीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांना एसीबी विभागात बोलावून त्यांच्याकडे सुमारे एक तास चौकशी केली. यामुळे सातार्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
एसीबी विभाग अमित राजे याचा तीन दिवस त्याचा शोध घेत होते. मात्र त्यांना तो सापडलाच नाही. मंगळवारी त्याने अटकपूर्वसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयात अर्ज दाखल झाल्यानंतर त्याबाबत पुढील सुनावणी 9 रोजी होणार आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |