01:10am | Dec 08, 2019 |
वाई : कर्नाड बँकिंग रिसर्च फौंडेशनच्यावतीने येथील दि वाई अर्बन को. आँप. बँकेस ठेवी रू. 1000 ते 1300 कोटी या गटांमध्ये चार पुरस्कार जाहीर झाले आहेत, दि. 21 व 22 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नॅफकॅबचे अध्यक्ष ज्योतिंदरभाई मेहता, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रमोद कर्नाड, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, रिझर्व्ह बँकेचे माजी महाव्यवस्थापक एल. एम. कांबळे, अर्थतज्ञ डॅा. विजय ककडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बँकेचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
सीए. चंद्रकांत काळे म्हणाले, कोल्हापूर येथील कर्नाडस बँकिंग रिसर्च फौंडेशनच्यावतीने दि. 21 व 22 डिसेंबर, 2019 रोजी राज्यातील सहकारी बँकांच्या या परिषदेमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षांत सहकारी बँकांनी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 523 नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका यामध्ये सहभागी होणार आहेत. आपल्या दि वाई अर्बन को. आँप. बँकेस सर्वोत्तम नागरी सहकारी बँक प्रथम क्रमांक, रिझर्व्ह बँकेच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन असलेली बँक (FSWM) यामध्ये बँकेस प्रथम क्रमांक, बँकेचे सर्वोत्तम अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी आदी चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दि वाई अर्बन बँकेने मागील आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये ठेवी व कर्जवाढीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दि. 31 मार्च 2018 रोजी बँकेच्या ठेवी 839 कोटी एवढ्या होत्या तर दि. 31 मार्च, 2019 रोजीच्या ठेवी रू. 932 कोटी तर दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजी बँकेच्या ठेवी रू. 1085 कोटी इतक्या ठेवी आहेत. सुमारे दीड वर्षाच्या काळात बँकेच्या ठेवी रू. 246 कोटींनी वाढल्या तर मार्च 19 पासून ठेवींमध्ये 153 कोटींची वाढ झाली आहे. कर्ज पुरवठ्यातही बँकेने चांगली कामगिरी केली असून दि. 31 मार्च, 2018 रोजी बँकेने दिलेली कर्जे रू. 563 कोटी होती. दि. 31 मार्च, 2019 रोजी रू. 632 कोटी होती. दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजी कर्जे रू. 721 कोटी इतकी झाली आहेत. कर्जातही रू. 158 कोटींची वाढ झाली आहे. बँकेची गुंतवणूक दि. 31 मार्च, 2018 रोजी रू. 302 कोटी होती, दि. 31 मार्च, 2019 रोजी रू. 330 कोटी तर दि. 30 नोव्हेंबर, 2019 रोजीची बँकेची गुंतवणूक रू. 417 कोटी इतकी आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात गुंतवणुकीत रू. 115 कोटींची वाढ झाली आहे. बँकेचे दि. 31 मार्च, 2019 अखेर ढोबळ एनपीए प्रमाण 4.28 टक्के इतके आहे.
बँक लवकरच म्हणजे दि. 21 जून, 2020 मध्ये आपल्या कारकिर्दीची 99 वर्षे पूर्ण करून शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्तानेही बँकेच्या इतिहासात मानाचे पान लिहिले जाणार आहे. एकंदरीत बँकेने सर्वच आर्थिक आघाड्यांवर प्रगती केलेली असून बँकेच्या यशाची घौडदौड अशीच कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सीए. चंद्रकांत काळे यांनी सांगितले. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्र चावलानी, संचालक डॅा. विनय जोगळेकर, श्री. मदनलाल ओसवाल, अॅड. प्रतापराव शिंदे, श्री. विवेक भोसले, अॅड. सीए. राजगोपाल द्रवीड, श्री. विद्याधर तावरे, श्री. मनोज खटावकर, प्रा. विष्णू खरे, श्री. भालचंद्र देशपांडे, डॅा. शेखर कांबळे, श्री. स्वरूप मुळे, संचालिका सौ. अंजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, तज्ञ संचालक सीए. किशोरकुमार मांढरे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |