सातारा : परखंदी, ता. वाई येथे पोपट पांडूरंग जाधव (मूळ रा.दिवडी ता.माण सध्या रा. वाई) यांनी शनिवारी सकाळी शाळेतच पेटवून घेतले. धक्कादायक बाब म्हणजे ते शिक्षक असून या घटनेने खळबळ उडाली आहेे. या घटनेत पोपट जाधव हे गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्यावर सिव्हीलमध्ये पुढील उपचार सुरु आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोपट जाधव यांनी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. इतर शिक्षक, कर्मचार्यांची पळापळ झाली. पोपट जाधव हे भाजल्याने त्यांना सहकार्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी पाठवले. सिव्हीलमध्ये त्यांना आणल्यानंतर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले. या घटनेत ते सुमारे ९० टक्के भाजल्याने ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. उपचारासाठी त्यांना दाखल केल्यानंतर त्यांनी नेमके असे का केले? घटनास्थळी नेमके काय घडले? याबाबतही कोणी बोलण्यास तयार नाही. यामुळे या घटनेचे गूढ बनले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |