12:36am | May 06, 2019 |
कराड : अपघातात जखमी असल्याचे सांगून दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल केलेल्या स्वप्निल जयवंत शिरतोडे (वय 21, रा. बाबरमाची, ता. कराड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, तो अपघात नसून स्वप्निलला विरवडे गावच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या तमाशावेळी जबर मारहाण झाल्याचे व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी पलूस तालुक्यातील ताकारी व तुपारी येथील पाच जणांवर खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. अक्षय रामचंद्र चव्हाण, रोहित किसन आडके, करण भरत आडके, रोहन भरत आडके (चौघेही रा. तुपारी, ता. पलूस) व सूरज गणेश कोरडे (रा. ताकारी, ता. पलूस), अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विशाल विष्णू शिरतोडे (रा. बाबरमाची, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत स्वप्निल शिरतोडे व फिर्यादी विशाल शिरतोडे हे दोघे दि. 17 फेब्रुवारी 2019 रोजी विरवडे (ता. कराड) येथील यात्रेला गेले होते. मित्रांकडे जेवण करुन रात्री दहाच्या सुमारास ते मित्रांसमवेत तमाशा पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गावातील विकास मदने, नागेश मदने, सोमनाथ जाधव, अजय मदने हेही त्यांच्याबरोबर होते. तमाशा पाहत असताना तेथे काही युवक आरडाओरडा करून दंगा करत होते. त्यामुळे विरवडे गावातील काही लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही ते युवक ऐकत नव्हते. त्यामुळे लोकांनी त्यांना ‘तुम्हाला तमाशा पहायचा असेल तर पहा, नाहीतर निघून जा’, असे सांगितले. त्यामुळे ते युवक चिडले व बाजूला रचून ठेवलेल्या जळणातील लाकडी दांडकी घेऊन लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी विशाल व स्वप्निल यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यातील काही युवकांनी विशाल शिरतोडेच्या पाठीत आणि एकाने स्वप्निल शिरतोडे याच्या डोक्यात जोरदार लाकडी दांडके मारले. त्यामुळे स्वप्निल जमिनीवर कोसळला. त्यानंतरही इतरांनी स्वप्निलला लाथाबु्क्क्यांनी व दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले.
स्वप्निल शिरतोडे जमिनीवर निपचित पडल्याने विशाल शिरतोडेने जवळ जाऊन पाहिले असता स्वप्निलच्या डोक्यातून रक्त येत होते. स्वप्निल बेशुद्ध पडल्याचे पाहून विशालने मित्रांच्या मदतीने स्वप्निलला उपचारासाठी कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये आणले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करुन त्याला दुसर्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर विशाल व त्याच्या मित्रांनी स्वप्निलला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु स्वप्निलला उपचारासाठी दाखल करत असताना विशाल शिरतोडे याने भितीपोटी तो ओगलेवाडीजवळ मोटरसायकलवरून पडून जखमी झाला असल्याचे सांगितले होते.
स्वप्निलवर उपचार सुरु असताना तो बरेच दिवस बेशुद्ध होता. स्वप्निल शुद्धीवर येत नाही व तो जगणार नाही असे वाटल्याने विशाल शिरतोडे याने सुमारे आठ दिवसांपूर्वी स्वप्निल याला झालेल्या मारहाणीबाबत त्याचे सख्खे चुलते मनोज बाजीराव शिरतोडे (रा. बाबरमाची, ता. कराड) यांना सांगितले. त्यानंतर शुक्रवार, दि. 3 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपचार सुरु असताना स्वप्निल शिरतोडे याचा मृत्यू झाला. त्यानंतर विशाल शिरतोडे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात ताकारी व तुपारी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पाच जणांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन मछले करत आहेत.
फिर्यादी विशाल शिरतोडे याने विरवडे गावात जाऊन तमाशावेळी मारहाण करणारी मुले कोण होती, याची माहिती घेतली असता गावातील मल्हारी बाबू मंडले यांच्या घरी त्यांचा मेहुणा अक्षय आडके (रा. तुपारी) व त्याच्यासोबत अक्षय चव्हाण, रोहित आडके, करण आडके, रोहन आडके व सूरज कोरडे यात्रेसाठी आले होते, असे समजले. यापैकी अक्षय आडके हा तमाशावेळी मंडले यांच्या घरीच होता, तर इतर पाच जणांनी तमाशाच्या ठिकाणी लोकांना मारहाण केल्याचे समजल्याचे विशाल शिरतोडे याने फिर्यादीत म्हटले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |