05:12pm | Oct 08, 2019 |
बिजवडी : माण मतदारसंघात विकासाच्या गप्पा मारणारे माजी लोकप्रतिनीधी मी दहा वर्षात एवढी विकासकामे केली ,पाणी आणले ,रस्ते केले असे म्हणत डांगोरा पिटतायत. तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाची इतकीच खात्री असेल तर घरी जाऊन निवांत बसा कशाला मतासाठी दारोदारी हिंडताय असा खोचक सवाल सौ.सुरेखाताई पखाले यांनी केला आहे.
बिदाल जि.प.गटातील महिलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी सौ.सोनलताई गोरे उपस्थीत होत्या. सौ.सुरेखाताई पखाले म्हणाल्या ,दहा वर्षात एवढी कामे केली म्हणणारे माजी लोकप्रतिनीधींच्या पायाखालची वाळू सरकली आहे.त्यांना कॉग्रेसमधून आपण निवडून येऊन शकत नाही.जनतेने आपली विकासकामे व पाणी चांगलच बघितल आहे.त्यामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागेल या भीतीने त्यांनी कॉग्रेसच्या डी.एन.ए सकट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पाणी आणलय म्हणताय मग टँकर कसे सुरू होते. तुम्हाला शेखरभाऊंची भीती वाटत होती म्हणूनच तुम्ही त्यांना मोक्यात अडकवल.त्यांना जनतेपासून दूर ठेवण्याच पाप तुम्ही केले.तरीही ते बाहेर राहून जनतेसाठी काम करत होते त्याची सर्व जबाबदारी मी सांभाळत होते.ते मला रोज विचारायचे मागेल त्यांना पाणी दे ,कोण मदतीसाठी आले तर मोकळ्या हाताने पाठवू नको.आता तुम्हाला जनताच मोका लावेल.महिलांसाठी एकही उपक्रम न राबवणारे आज दुसऱ्यांनी राबवलेल्या उपक्रमांना नाव ठेवतायत.त्यांना तेवढच जमतं.
अहो बहिणीला भाऊबीजेला भाऊ फक्त आला तरी समाधान वाटते त्याने किती रूपयाची साडी आणलीय की नाही यापेक्षा तो आला की त्यांना मोठा आधार वाटतो.तुमची माताभगिनींच्या विषयी असलेली आपुलकी सर्वांना कळालीय. अन तुम्ही माताभगिनींच्या स्वाभीमानाची भाषा करताय हे तुम्हाला शोभतेय का.
वावरहिरे परिसरातील एका वस्तीचा गेली ५२ वर्षे रस्ता झाला नव्हता तो रस्ता शेखरभाऊंनी स्वखर्चातून करून दिला आहे.असे एक ना अनेक रस्ते भाऊंनी स्वखर्चातून करून दिले आहेत. विकासाच्या नुसत्या कागदोपत्री गप्पा मारणारे शासनच्या निधीतूनही तो रस्ता करू शकले नव्हते.ज्यांना फक्त घ्यायच माहित असणाऱ्यांना द्यायच कसं कळणार त्यामुळे त्यांनी शेखरभाऊंच्या कार्यावर व महिलांच्या स्वाभिमानावर तर काहीच बोलू नये असा उपरोधिक टोलाही सौ.सुरेखाताई पखाले यांनी माजी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला आहे.
माताभगिनींना दिलेल्या भेटीचा माजी लोकप्रतिनीधीकडून अपमान...
जे बहिणीचा आदर ,सन्मान करू शकत नाहीत ते मतदारसंघातील महिलांचा काय आदर व सन्मान करणार.आपण ज्या जनतेच्या जीवावर गेली १० वर्षे सत्ता गाजवली.त्यावेळी स्वार्थाने बरबरटलेले एक रूपयाची कोणाला मदत करू शकले नाहीत.आज तेच दुसऱ्याने तीस रूपयाची साडी वाटली म्हणत मातभागिनींला दिलेल्या भेटीचा अपमान करतायत.आता त्याच माताभगिनीं तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.
- सौ.सुरेखाताई पखाले
त्या आमदाराने काय दिलेय आजपर्यंत...
माझ्या ७० वर्षाच्या कारकिर्दीत तरी मी माताभगिनीसाठी झटणारा नेता बघितला नाय.जो माताभगिनींवर जीवापाड प्रेम करतूय. त्यांच्यासाठी कार्यक्रम लावून त्यांना व्यासपीठ मिळवून देतूय.त्याने आम्हाला पाच रूपयाची साडी देऊ दे पण ती दिली .त्या आमदाराने आम्हाला आजपर्यंत काय दिलय .आम्ही त्या व्यासपीठावर जावून मनसोक्त खेळलो ,आनंदाने नाचू गावू लागलो.हेच त्या आमदाराला बघावल नाय.
- श्रीमती राधाबाई कांबळे ,शिरसवडी ता.खटाव
आमच्यासाठी एक धागा महत्वाचा...!
महिलांसाठी किती रूपयाची साडी आहे हे महत्वाचे नाही.आमच्यासाठी त्या साडीतला एक धागा महत्वाचा असतो. आम्हाला शेखरभाऊंनी तो एक धागा देऊन दिवाळी अगोदर माहेरची भाऊबीज दिली आहे.त्या धाग्याची तुम्ही किंमत करू नये.आपल्या माताभगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये म्हणून दारात पाण्याचे टँकर पाठवून दिलेत.आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत.त्यामुळे आम्हाला पंढरपूरला विठ्ठलाकडे जावे लागत नाही.शेखरभाऊच आमचे विठ्ठल आहेत.
- श्रीमती अरूणा मुळीक ,दहिवडी
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |