सातारा : दिनांक २५ ऑगस्ट २०१९ रोजी होणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या ८ व्या आवृत्तीच्या खुल्या प्रवर्गातील स्पर्धकांसाठी असणारी ऑनलाईन नोंदणी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक ७ एप्रिल २०१९ रोजी पहाटे ५.०० वाजता सुरु झाली अन अवघ्या १ तास १५ मिनिटांत बाहेरगावच्या व साताऱ्यातील सुमारे ४००० धावपटूंनी नोंदणी करुन एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
यापुर्वीच सातारा जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी राखीव असणारी ऑनलाईन नांव नोंदणी १ एप्रिल रोजी सुरू झाली होती. तब्बल २००० सातारकरांनी यात फक्त दीड दिवसात विक्रमी नावनोंदणी केली होती. म्हणजेच एकूण ६००० मॅरेथॉनपटूंनी २१ किलोमीटर अंतराच्या मुख्य शर्यतीत सहभाग नोंदविला आहे. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे हे विशेष. इतक्या कमी वेळेत एवढया मोठ्या संख्येने स्पर्धकांनी नाव नोंदणी केली, यावरून या स्पर्धेची लोकप्रियता किती आहे हे दिसून येते.
सातारा शहराला लाभलेले नैसर्गिक वरदान, तसेच स्पर्धेचे केले जाणारे शिस्तबद्ध आणि सुयोग्य नियोजन, सातारकर नागरिकांचा स्पर्धेला असणारा भक्कम पाठिंबा आणि वाढता सहभाग ही यामागची मुख्य कारणेआहेत. सातारची ओळख आता देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नकाशावर "मॅरेथॉनचे सातारा" अशी झाली आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉनची नावनोंदणी कधी सुरु होतेय याकडे देशविदेशातील हजारो स्पर्धक अगदी डोळे लावून वाट पाहत असतात आणि ऑनलाईन पद्ध्तीने नावनोंदणी सुरू होताच केवळ काही तासांतच सर्व जागा भरल्या जातात.
पुर्वी सातारकरांची नावनोंदणी करण्यासाठी ऑनलाईन व्यतिरिक्त ऑफलाईन फॉर्म सुद्धा भरून घेतले जात. परंतु त्यामुळे बऱ्याच अडचणी यायच्या, चुकीची माहिती भरली जायची किंवा माहिती संकलित करण्यात अनेक अडचणी येत. संयोजकांनी हळू हळू लोकांना ऑनलाईन कडे वळविण्याचा प्रयत्न केला व आता गेली दोन वर्षापासून तर १०० टक्के नावनोंदणी ऑनलाईन केली आहे आणि त्यालासुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन होणार नाही, जमणार नाही, सातारकर करणार नाहीत, असा नकारात्मक विचार न करता - "केल्याने होत आहे रे".... असा पवित्रा घेतल्यास काहीही अशक्य नाही हेच यातून सिद्ध होते. शिस्त पाळल्यामुळे आणि लोकांना वेळेत नावनोंदणी करण्याचे महत्व पटवून दिल्यामुळे आता स्पर्धेच्या तब्बल ५ महिने आधीच सर्व सातारकरांनी नावनोंदणी ऑनलाईन पद्ध्तीने पूर्ण केली आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे. हा एक मोठा सकारात्मक बदल आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |