सातारा : माणसाच्या जगण्याची सुरुवात जन्मापासून होते. तो जन्मदिवस आयुष्यभर साजरा केला जातो. परंतू सायगांव, ता. जावली येथील जगताप कुटूंबियांमध्ये पणतु व पणजोबा यांचा एकत्रित वाढदिवस येण्याचा दुर्मिळ योगायोग घडला आहे. पणतुचा पहिला, तर पणजोबांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सायगांव येथील विश्राम रामचंद्र जगताप यांनी नशिब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. त्याठिकाणी पोष्टामध्ये नोकरी लागल्यानंतर मंत्रालयातील पोस्टमास्तर या पदावरुन ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा 75 वा व त्यांचा पणतु यश अमोल जगताप याचाही 2 मार्च रोजी पहिला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. यावेळी त्यांचे मित्र परिवार, नातेवाईक तसेच आप्तेष्ठ यांनी या दोहोंनाही भरभरुन शुभेच्छा दिल्या. यशचे वडील अमोल हे सध्या अमेरिकेत नोकरीस असून ते या वाढदिवसासाठी हजर झाले होते. त्यामुळे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. अबालवृद्धांपासून सर्वजण एकत्र जमल्यामुळे पुन्हा एकदा कौटुंबिक जिव्हाळा दिसून आला. तीन पिढ्यांचा सेतू असे या वाढदिवसाला स्वरुप आले होते. कामोठे येथे वाढदिवसासाठी सायगांव, सातारा, धोम, ओझर्डे, डोंबवली, खारघर, फलटण, लोणंद, पुणे येथून मोठ्या संख्येने हितचिंतक उपस्थित राहिले होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |