02:58am | Jan 19, 2020 |
सातारा : कर्ज प्रकरणात आलेल्या कागदपत्रांचा परस्पर वापर करुन सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. संशयित सर्व जिल्ह्यातील असून यापाठीमागे मोठी टोळी असून त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. दरम्यान, संशयित महागडे मोबाईल फायनांन्स कंपनीकडून घेवून फसवणूक करत होते.
सुनयन सुमंत शुक्ल (वय 31, रा.बोरगाव ता.सातारा, मूळ रा.कौलखेड जि.अकोला), आतिक अफजल शेख (रा.गुरुवार पेठ), प्रफुल्ल प्रकाश बुरुंगे (रा.मालखेड पो.बेलवडे ता.कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमिर फिरोज मुल्ला (रा.गोंदवले ता.माण) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार अमिर मुल्ला यांच्या आईच्या नावाची कर्जाची कागदपत्रे सुनयन शुक्ल याने परस्पर वापरली. त्या कागदांवर परस्पर खोट्या सह्या करुन 37 हजार रुपयांचे दोन मोबाईल फायनांन्स कंपनीतून कर्ज प्रकरण मंजूर करुन खरेदी केले. ही बाब तक्रारदार यांच्या निदर्शनास आल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. माहितीवरुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये चौघांची लिंक असल्याचे समोर आले.
संशयितांनी आपआपसात संगनमत करुन तसेच मोबाईल विकत घेताना त्याच्या पावत्या नसतानाही ते खरेदी केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांचा तपास सुरु असताना आणखी चार तक्रारदार पोलिसांकडे गेले. संबंधित तक्रारदार यांच्या खात्यातून पैसे कट होत होेते. ते पैसे या संशयितांनी कागदपत्रांचा गैरवापर करुन त्यावर खोट्या सह्या करुन मोबाईलसाठी कर्ज काढल्याचे समोर आले. अशाप्रकारे 4 लाख 33 हजार रुपयांचा फसवणूक झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. आतापर्यंत तिघांना अटक केली असून आणखी एकाचा पोलिस शोध घेत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |