सातारा : कॅलिफोर्निया (अमेरिका) तून आलेल्या 63 वर्षीय अनुमानित रुग्णही कोविड-19 (कोरोना) बाधित निष्पन्न झाला असून या याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दुजोरा दिला आहे.
परवा दि. 22 रोजी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथून प्रवास करुन आलेल्या एका 63 वर्षीय पुरुष अनुमानित रुग्णाला ताप व घसा दुखत असल्यामुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या अनुमानित रुग्णाच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एन.आय.व्ही.कडे पाठविण्यात आले होते. दरम्यान, या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. तथापि संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काल संध्याकाळी एक 45 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे सातारा जिल्हा प्रशासन हादरुन गेले होते. एकूणच सातारा जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर काल रात्री उशिरा कोरोनाचा 63 वर्षीय अनुमानित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने कोणीही घाबरुन जावू नये, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे, हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |