खंडाळा : वाई उपविभागीय अधिकारी यांच्या सातारा व पुणे जिल्ह्यातून केलेल्या तडीपारी आदेशाचा भंग करत सातारा जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत मोठ्या शिताफीने सराईत तडीपार गुंडाला अटक केली आहे. विशेष म्हणजे तडीपार केलेल्या सरीत गुंडाने एका वर्षात तब्बल तीन वेळा वाई उपविभागीय अधिकारी यांच्या तडीपारी आदेशाचा भंग करत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. वैभव जोतिबा शिवतारे ( वय २५,रा.धनगरवाडी ता.खंडाळा ) असे तडीपारीच्या आदेशाचा भंग केलेल्या सराईत गुंडांचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रकाश फरांदे, अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड , महिला पोलीस स्वाती खैरमोडे यांच्या पथक कोम्बिंग ऑपरेशन राबवित असताना धनगरवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत असणाऱ्या कदम वस्ती याठिकाणी शिरवळ पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वैभव जोतिबा शिवतारे हा वावरत असताना दिसून आला. माजी पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी पाठविलेल्या प्रस्तावाद्वारे सराईत गुन्हेगार वैभव शिवतारे याला तत्कालीन प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी १८ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये दोन वर्षासाठी सातारा व पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानुसार आदेशाची अंमलबजावणी करीत शिरवळ पोलीसांनी वैभव शिवतरे याला मुंबई येथील मानखुर्द पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोडले होते.त्याला सातारा जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी घेतली आहेस का, असे विचारले असता परवानगी घेतली नसल्याचे शिरवळ पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार शिरवळ पोलीसांनी वाई उपविभागीय अधिकारी यांच्या तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यास ताब्यात घेऊन अटक केली. विशेष म्हणजे वैभव शिवतारे याने गेल्या एका वर्षात तब्बल तीन वेळा तडीपारी आदेशाचा भंग केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अमोल जगदाळे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत निकम हे करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |