सातारा : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी, पत्रकार पेन्शन, छोटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे, अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे आणि मजिठियाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सातारा जिल्हा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्यावतीने सोमवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व सर्व तहसील कार्यालयांसमोर सकाळी 11 वाजता अंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला पण त्याची अंमलबजावणी होत नाही. पेन्शनची घोषणा झाली पण अजून त्याचीही अंमलबजावणी नाही. छोटया वृत्तपत्रांसाठीच्या जाहिरात धोरणात बदल करून ती छोटी वृत्तपत्रे बंदच होतील अशा पध्दतीन धोरण आखले जात असून त्याचा मोठा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसणार आहे. मजिठियाच्या अंमलबजावणीबाबतही शासनाची उत्साही भूमिका नाही.सरकार घोषणा करते पण अंमलबजावणी करत नसल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये मोठा असंतोष आहे. तो व्यक्त करण्यासाठी सोमवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलन करतील. आपल्या भागातील आमदारांना भेटून पत्रकारांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्याबाबत विनंती करावी. 26 तारखेला छोटया आणि जिल्हा वृत्तपत्रांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर अग्रलेख लिहून शासनाचे लक्ष पत्रकारांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
16 नोव्हेंबर रोजी राज्यातील पत्रकारांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या सरकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आता थेट रस्त्यावर उतरून पत्रकार आपला आक्रोश जनता आणि सरकारच्या कानावर घालावा. देशात आणि राज्यात विविध मार्गानं पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे केल जाणार दुर्लक्ष हा त्याचाच भाग आहे. सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी आपसातील वाद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे, असेही देशमुख यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनेही जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे. दहा तालुक्यांच्या तहसीलदार कार्यालयांसमोर त्या त्या तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे पत्रकार 11 वाजता आंदोलन करतील व तहसीलदारांना निवेदन देतील. सातारा शहर व सातारा तालुक्यातील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 वाजता आंदोलन करतील व जिल्हाधिकार्यांना निवेदन देतील. संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी 26 नोव्हेंबर रोजी आंदोलनात उतरावे, से आवाहन सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |