02:11am | Apr 21, 2019 |
सातारा : मतदारांनी मतदान करायला जाताना मोबाईल सोबत घेवून जावू नये ; मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई असून निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
मंगळवार दि. 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. मतदानाचा हक्क् बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे, मतदान ओळखपत्र नसल्यास मतदाराने पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करता येणार असून अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.
महिला आपल्या लहान मुलांना घेऊन मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी येतात, त्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मतदानासाठी एका पुरु्षामागे 2 महिलांना मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 15 प्रकारच्या सुविधा मतदान केंद्रावर देण्यात येणार आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी पाळणघराची सुविधाही देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीटही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.
मतदान केंद्रात मोबाईल बंदी
मतदारांनी मतदान करायला जाताना मोबाईल सोबत घेवून जावू नये ; मतदान केंद्रात मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने आपला मोबाईल घरीच ठेवून यावे.
गरोदर महिला, वृध्द व दिव्यांग मतदारांना थेट प्रवेश
गरोदर महिला व वृध्दांना मतदान केंद्राच्या बाहेर उभे न करता मतदानासाठी मतदान कक्षात थेट प्रवेश दिला जाणार आहे. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी व मतदान केल्यानंतर घरी सोडवण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे. व्हिलचेअरची सुविधाही देण्यात येणार आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |