01:00am | Jul 23, 2019 |
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) सहाजणांच्या टोळीकडून सोने, चांदी, आणि मोबाईलसह 14 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. अटक केलेल्या टोळीने सातारा, सांगली जिल्ह्यात अक्षरश: धुडगूस घातला असून 3 दरोड्यासह 85 घरफोड्या केल्या असल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली आहे.
जावेद अनिल काळे (रा.फडतरवाडी), करण वरिसर्या काळे (रा.भांडेवाडी), निकाल लत्या काळे (रा.कोकराळे), संकेत अलिशा काळे (रा.सिध्देश्वर कुरोली), अभिजीत मंज्या शिंदे (रा.सिध्देश्वर कुरोली), ऋतुराज भावज्या शिंदे (रा.काटकरवाडी सर्व ता,खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन महिन्यांपूर्वी वडूज, खटाव या परिसरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. सलग दरोड्यांमुळे सातारा पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. एलसीबीचे पथक या घटनांचा पाठपुरावा करत होते. यावेळी एका संशयित आरोपीला पकडल्यानंतर त्याने दरोड्याची कबुली दिली. एलसीबी पथकाने अधिक चौकशी केल्यानंतर ते हडबडून गेले. संशयित आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची माहिती देत गेल्यानंतर तो एका मागोमाग एक अशा तब्बल 85 घरफोडी व दरोडे टाकल्याची खळबळजनक कबुली दिली. दरोडा व घरफोड्यांमध्ये सहभागी इतर साथीदारांची नावेही संशयिताने दिली. साथीदारांची नावे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्यांची उचलबांगडी केली.
सर्व संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करत असताना सुमारे 2016 पासून सातारा जिल्ह्यातील औंध, वडूज, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, म्हसवड, दहिवडी यासह सांगली जिल्ह्यतील विटा येथे दरोडा व घरफोड्या केल्याची कबुली सर्व संशयितांनी दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनाही याची माहिती देण्यात आली. अटक संशयित आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी प्रत्येक पोलिस ठाण्यामधील दाखल गुन्ह्यांची संख्या व घटना यांचा संबंध पाहिल्यानंतर तो संशयितांनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत जुळला. यानंतर पोलिसांनी संशयितांकडून ऐवज, मुद्देमाल जप्त करण्यास सुरुवात केली. 85 घरफोडी केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांना 36 घरफोड्यांमधील मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, एलसीबीचे पोनि विजय कुंभार, वडूजचे पोनि अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसनन जर्हाड, पोलिस हवालदार सुधीर बनकर, संतोष पवार, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, संजय जाधव, विजय सावंत, अर्जुन खाडे, ओंबासे, देवकुळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |