गोखळी : पुणे -पंढरपूर रोडवरील रावरामोशी पुलावरून अनेक वेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या पुलाच्या दुरूस्ती कडे दुर्लक्ष करून फलटण नजिकच्या कॅनॉल वरील पुलांचे रूंदीकरण म्हणजे. ' दुःख रेड्याला आणि ईन्जेक्शन पखालीला ' असा फंडा बांधकाम खात्याने राबवलेला असल्याची प्रतिक्रिया नागरीकांनामधून व्यक्त होत आहे.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते पुलांचे काम पावसामुळे पूर्वी होणे गरजेचे असताना ज्या पुलांची मागणी नाही त्या पुलांचे दुरूस्ती रूंदीकरणची कामे सुरू आहेत ती कामे नागरीकांचे मागणी वरून की लोकप्रतिनिधी च्या सांगण्यावरुन सुरू आहेत याचा खुलासा झालेला नाही. 'विडणी नजिकच्या रावरामोशी पूलांवरून अनेक वेळा लहान मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.या पुलाच्या दुरूस्ती साठी अनेक वेळा वर्तमान पञांतून बांधकाम खात्याचे लक्ष वेधले,नागरीकांनी अनेक वेळा मागणी केली परंतु या कडे दुर्लक्ष केले कधी लक्ष देणार ? गत वर्षी सावित्री नदीवरील पूल कोसळला मोठी जिवित हाणी झाली होती . नीरा कॅनॉल वरील रावरामोशी पूलांवरून दुर्घटना घडलेल्या नंतर दुरूस्ती होईल का ? असा सवाल नागरीकांचे कडून करण्यात येत आहे. जुन्या पूलांची कामे होणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यातील फलटण -सातारा हा दोन राज घराण्याला जोडणारा मार्ग आहे या मार्गावरील पुलांची कामे न केल्यामुळे थोडा पाऊस झाला तरी पुरामुळे रस्ते वाहतूकीस बंद पडतात मध्यंतरी पावसामुळे मिरगांव येथील ओढ्यास पूलावरून पाणी असल्याने वाहतूक बंद पडलेल्या मुळे .बांधकाम खात्याच्या बेवाफाईमुळेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना रस्ता बदलुन वडजल मार्गे फलटण ला यावे लागले. फलटण -सातारा हा दोन राज घराण्यास जोडणारा महत्त्वाचा राजमार्ग आहे. या मार्गावर सातारा, कराड, पंढरपूर, महाबळेश्वर, पाचगणी, महाड, कोल्हापूर, अहमदनगर,बारामती मराठवाडा भागातून प्रवाशांची वाहतूक होत असते .पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा असणारा मार्ग केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षतेमुळे झालेला नाही या मार्गांचे रूंदीकरण आणि दुभाजक असणे गरजेचे आहे संबंधीत मार्गानी सर्व कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |