02:02am | Jan 12, 2020 |
सातारा : सी.ए. ए. नागरीकत्व सुधारणा कायदा व एन.आर.सी. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान जेएनयू मधील विद्यार्थ्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी करत या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की केंद्र सरकारने सी.ए. ए. नागरीकत्व सुधारणा कायदा आणलेला आहे. तो कायदा या देशाच्या संविधानाला अनुसरून नसल्याने व संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का पोहोचवणारा असल्याने देशाच्या अखंडतेला तडा देणारा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा. एन. आर. सी. राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी हा कायदा देशातील सर्वसामान्य जनतेला त्रासदायक आहे. या देशात जन्मलेल्या प्रत्येकाला या देशाचे नागरिकत्व देण्याची तरतूद असताना सुद्धा त्याला डावलून सी.ए. ए. नागरीकत्व सुधारणा कायदा लागू करण्याच्या उद्देशाने ही दुरुस्ती जाणीवपूर्वक केली असल्याचे दिसून येत आहे. या देशातील अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी, भटके-विमुक्त, ओबीसी, धार्मिक अल्पसंख्यांक, अशिक्षित, शेतमजूर, ग्रामीण भागातील जनतेला आपले नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करणे अवघड होणार आहे. किंवा ते शक्य होणार नसल्याने सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय होणार आहे, त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा.
जेएनयू सारख्या विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सुविधा व आपले हक्क यावर आंदोलन करून भूमिका मांडण्याचा युवकाने प्रयत्न केला असता त्याच्यावर सुनियोजित पद्धतीने प्रतिगामी विचारांच्या लोकांनी भ्याड हल्ला केला.हा हल्ला देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी झाला. की ज्या ठिकाणी देशाचे गृहविभागाचे मंत्रालय आहे किंवा पंतप्रधानांचे कार्यालय आहे. अशा ठिकाणी जर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यात व विद्यार्थ्यांना संरक्षण देण्यात केंद्रशासन कमी पडत असल्याचे निदर्शनास येत असल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा देऊन हल्लेखोरांना शासन करण्यासाठी कठोर कारवाई करावी. या मागण्यांचा केंद्र सरकारने विचार करून तातडीने योग्य तो निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी व विविध पुरोगामी पक्ष संघटना यांच्यावतीने संयुक्तरीत्या तीव्र स्वरूपाची आंदोलने करतील, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. आंदोलनात चंद्रकांत खंडाईत, सुनील त्रिबंके, राजेंद्र माने, सुभाष गायकवाड, दादासाहेब केंगार, दयानंद माने, विजयराव गायकवाड, विजयराव गडांकुश, जगन्नाथ वाघमारे, किरण मोरे, सुभाष पिसाळ यांनी सहभाग घेतला.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |