सातारा : आनेवाडी, ता. जावली येथील सातारा पुणे महामार्गावरील टोलनाक्यावर टोल व्यवस्थापनाने सातारा जिल्ह्यातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची टोलवसुलीसाठी नियुक्ती केल्यामुळे टोलनाक्यावर कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी टोलनाक्यावर गुंडांनी टोल देण्याच्या कारणावरुन सातार्यातील एका सुशिक्षित युवकाला बेदम मारहाण केली होती. त्या अनुषंगाने संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या वतीने पोलीस अधीक्षक सातारा यांना निवेदन देवून टोलनाक्यावरील गुंडांवर मोक्कान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दि. 12 मे रोजी सातारा येथील एक सुशिक्षित युवक जोशी विहिर, ता. वाई येथे लग्नकार्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी आनेवाडी टोलनाक्यावर आल्यानंतर टोल देण्याच्या कारणावरुन टोल नाक्यावर कार्यरत असलेला स्थानिक व्यवस्थापक विशाल पिसाळ याने या युवकांना टोल भरण्याची सक्ती केली. यावेळी या युवकांनी आम्ही स्थानिक आहोत, त्यामुळे आम्ही का टोल देवू? अशी विचारणा केल्यामुळे टोल नाक्यावरील गुंड व सातार्यातील युवकांमध्ये बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर टोलनाक्यावरील सुमारे दहा-पंधरा युवकांनी गाडीतील एका युवकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत सातार्यातील तो तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात टोलनाक्यावरील गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू आनेवाडी टोलनाक्यावरील गुंड क्षुल्लक कारणावरुन वाहनधारकांना बेदम मारहाण करीत कायदा हातात घेत असतात. आनेवाडी टोलनाक्यावरील गुंडगिरीमुळे सातार्याचे नाव राज्यभरात बदनाम झाले आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील अशा गुंडांची चारित्र्यपडताळणी करुन दोषी गुंडांवर मोक्कान्वये कारवाई करण्याची मागणी संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी सातारा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |