सातारा : सातारा शहर परिसरात ठिकठिकाणी मोबाईल चोरुन तो विक्री करत असताना विकास अशोक खंडागळे (रा.प्रतापसिंहनगर, सातारा) याला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयिताकडून आतापर्यंत पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शेंद्रे ता.सातारा येथून सहा मोबाईल चोरी झाल्याची माहिती पोलिसांना समजली. तालुका पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर संशयित विकास खंडागळे हा स्टँड परिसरात जुने मोबाईल विकत असल्याची माहिती समजली. तालुका पोलिसांनी त्याची उचलबांगडी केली असता त्याच्याकडे पाच मोबाईल सापडले. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने शेंद्रे येथील मोबाईल चोरल्याची कबुली दिली. मात्र त्या चोरीतील एक मोबाईल उर्वरीत चार मोबाईलबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. संशयिताला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, संशयित आरोपी विकास खंडागळे हा मोबाईल चोरी केल्यानंतर तो ते मोबाईल विक्री करण्यासाठी भन्नाट युक्ती वापरत होता. सातारा स्टँड येथे थांबून तो प्रवाशांना ‘घरातील अडचण आहे. हा माझा मोबाईल असून तो कमी कीमतीत घ्या,’ अशी विनंती करत होता. आतापर्यंत त्याने असे मोबाईल विकल्याची धक्कादायक कबुलीही दिली आहे. पोनि पी.डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुजीत भोसले, आनंदा भोये, नष्टे, राजू मुलाणी यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सुजीत भोसले पुढील तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |