सातारा : सातार्यातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका महिलेला मोबाईलवर मॅसेज करुन 80 हजारांच्या खंडणीचा मॅसेज डी गँगमधील एका पंटरने पाठवला असून 80 हजार न दिल्यास तिच्यासह कुटूंबाला संपवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सातार्यातील एका महिलेला दि. 12 रोजी If you won't give 80,000 will shoot you and your family soon... Dawood gang' असा मॅसेज आला. या मॅसेजमुळे संबंधित डॉक्टर महिलेला धक्का बसला. या मॅसेजबाबतची माहिती त्या महिलेने तिच्या कुटूंबियांना दिली. तिचे कुटूंबिय या मॅसेजमुळे घाबरुन गेले. यानंतर या परिवाराने पोलीस ठाण्यात धाव घेत मॅसेजबाबतची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ मुख्यालयातील सायबर पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी याबाबत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर सायबर पोलीस अनोळखी नंबरवरुन आलेल्या त्या मॅसजचा तपास करीत आहेत. यापूर्वीसुद्धा अनेकांना अशाच पद्धतीचे मॅसेज मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संबंधित संशयित खरेच दाऊद गँगमधील पंटर आहे की, सायबर गुन्हेगार आहे? याबाबतचा तपास पोलीस करीत असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिली आहे. तसेच अशाप्रकारचे मॅसेज आल्यास न घाबरता सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |