02:11am | Jan 24, 2020 |
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) कारवाईचा धडाका लावत दोन टोळ्यांचा पर्दाफाश केला. एका घटनेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडल्यानंतर त्यांनी 25 गुन्ह्यांची कबुली दिली. दुसर्या घटनेत वाई येथून दोघांकडून गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवाई एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दरोडा, पिस्टल प्रकरणात पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्या पकडलेल्या टोळीमध्ये नाना पाटेकर उर्फ यश भाउबीज उर्फ भावज्या उर्फ बाबू भोसले उर्फ काळे (वय 19), सुर्यगन उर्फ गाल्या शेज्या भोसले (वय 19, रा.आरफळ ता.सातारा), अतिक्रमण विजय काळे (वय 29, रा.रेवडी ता.कोरेगाव)अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 15 रोजी एलसीबीचे पथक सातारा-लोणंद रोडवर गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वडूथ गावच्या हद्दीत काही संशयित दबा धरुन बसले होते. एलसीबीच्या पथकाने संशयितांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे हत्यारे होती. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संशयित दरोडा, घरफोडी करण्याच्या तयारीत होते.
पोलिसांनी याप्रकरणी संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी यापूर्वी दरोडा व घरफोड्या केलेल्याची मालिकाच सांगितली. संशयित टोळीने सातारा तालुक्यातील वाढे, कराड, कोरेगाव, शिवथर, बोरगाव या ठिकाणी तब्बल 25 घरफोड्या केल्याची कबुली दिली. दरम्यान, यामधील अनेक घटना पोलिस ठाण्यात दाखल नसल्याचेही समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी याप्रकरणी नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.
दुसरी कारवाई एलसीबीच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी निलेश उर्फ गोट्या संजय सोनावणे (वय 24), मोहम्मद शोएब खलील मोमीन (वय 33, दोघे रा.वाई), विकास उर्फ लाल्या अनिल जाधव (वय 24, रा.बावधन ता.वाई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, वाईमधील फुलेनगर येथे दोघेजण गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानुसार दि. 22 रोजी पोलिसांनी सापळा रचला असता दुचाकीवर दोघेजण आढळून आले. पोलिसांनी संशयितांना थांबण्यासाठी सांगताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी दुचाकीसह 1 लाख रुपयांचा तो सर्व मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ.सागर वाघ, फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार तानाजी माने, संतोष पवार, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, निलेश काटकर, विशाल पवार, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत, घोरपडे, बर्गे, गायकवाड, पवार, नाचण, पोळ, महाडीक, देशमुख, सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |