12:17am | Sep 12, 2019 |
सातारा : औषधाचा ट्रक हैद्राबाद येथे पोहच करण्यास सांगितल्यानंतर तो तेथे न घेवून जाता तब्बल 28 लाख रुपयांची औषध चोरी केल्याप्रकरणीचा छडा सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाच्या पथकाने लावला. याप्रकरणी ट्रक चालकाला अटक करुन चोरीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.
अब्दुल मगदूम नदाफ (वय 32 मूळ रा.हरणाक, सिंदगी, विजापूर सध्या रा.रहिमतपूर ता.कोरेगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहेे. याप्रकरणी राजकुमार श्रीरंग शिंदे (वय 54, रा.शाहूनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 8 ऑगस्ट रोजी स्वराज ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तक्रारदार यांनी शेतीबाबतची औषधे सातार्यातून हैद्राबाद येथे पोहचवण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार एम एच 11 एएल 7869 या ट्रकमध्ये सुमारे 28 लाख रुपयांची औषधे भरण्यात आली. ट्रक चालकाला संबंधित औषधे हैद्राबाद येथे ज्याठिकाणी पोहच करायची होती त्याचा पत्ता, फोन क्रमांक दिला होता. त्यानुसार सातार्यातून ट्रक रवाना झाला.
मात्र ट्रक हैद्राबाद येथे पोहचला नाही. यामुळे तक्रारदार यांनी स्वराज ट्रान्सपोर्ट मालकाकडे तक्रार केली. दोघेही ट्रक चालकाला फोन लावत होते. मात्र चालकाशी संपर्क होत नव्हता. अखेर याप्रकरणी तक्रारदार यांनी शहर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. डीबीचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी सर्व माहिती घेतल्यानंतर संशयित व त्याने लपवलेला ट्रकची माहिती मिळाली. पोलिसांच एक पथक विजापूर येथे शोधासाठी गेल्यानंतर त्यांना चालक ट्रकसह सापडला. दरम्यान, चालकाकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याच्या मालकाने त्याचे पैसे थकवल्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |