सातारा : कांदे पिकाची पाहणी करुन तशी नोंद सातबारा उतारावर केल्यानंतर त्या मोबदल्यात 500 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंप्रद ता.फलटण येथील तलाठी अनिलकुमार गौरीहर कुदळे (वय 54, रा.बिरदेववाडी, जाधवनगर, फलटण) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. दरम्यान, अवघ्या पाचशे रुपयांच्या मागणीसाठी तलाठ्याला अटक झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांची टाकळवाडी ता.फलटण येथे जमीन आहे. तक्रारदार यांनी त्याठिकाणी कांद्याचे पीक घेतले आहे. कांद्याचे पीक घेतल्यानंतर तक्रारदार हे तलाठी अनिलकुमार कुदळे याला भेटले. संबंधित पीकाची पाहणी करुन त्याची नोंद करुन सातबारा देण्याची मागणी केली. याकामासाठी तलाठ्याने 500 रुपयांची मागणी केली व पीकाची नोंद करुन बाकीची पुर्तता केली. मात्र पैशाची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी याप्रकरणी एसीबी विभागात तक्रार दिली.
एसीबी विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारदार यांच्याकडे संशयित तलाठी अनिलकुमार कुदळे याने दि. 14 जानेवारी रोजी लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये समोर आले. पैशाची मागणी झाल्यानंतर पुढे संशयिताने लाचेची रक्कम स्वीकारले नाहीत. लाचेची रक्कम स्वीकारली जात नसल्याने अखेर बुधवारी तलाठी कुदळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या घटनेची माहिती फलटणसह सातार्यात पसरल्यानंतर खळबळ उडाली. पोलिस उपअधीक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आरीफा मुल्ला या तपास करत आहेत.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |