06:20pm | Dec 08, 2019 |
फलटण (राजेंद्र पोरे) : फलटण बसस्थानक आगाराला राज्यात अव्वल म्हणून गौरविल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाले होते. परंतू प्रत्यक्षात काही वर्षांपासून फलटण बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. गुडगाभर खोल खड्ड्यांमध्ये बस आपटल्यानंतर अनेकांची कंबर मोडत असल्यामुळे फलटण बसस्थानक नको गं बाई, असे अनेक प्रवासी सूर आळवत कंबर माझी मोडली गं, जाता फलटणला गं जाता फलटणला असे म्हणत आहेत.
फलटणच्या विकासाबाबतच्या अनेक विकासाच्या मोठ्या गप्पा फलटणचे राजकारणी मारत असतात. वरकरणी फलटणमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे वाटत असते. मात्र वस्तुस्थिती अत्यंत भयानक आहे. पुणे, बारामती, पंढरपूर ते मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या फलटण शहरात एक बसस्थानक आहे. मात्र हे बसस्थानक गेल्या काही वर्षांपासून असुविधेच्या गर्तेत अडकले आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली या आगारामध्ये मोठमोठ्ठाले खड्डे खोदले आहेत. पावसाळ्यात तर याठिकाणी छोटा तलावच निर्माण झाला होता. अशा तलावातून वाट काढत बसचालक गाडी हाकत होते. परंतू या गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांची मात्र दैना होत होती. फलटण बसस्थानकावरील हाती घेण्यात आलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्यांसह चक्क फलटणमधील पत्रकारांनीही आंदोलन केले होते. फलटणमधील लोकप्रतिनिधींनी याबाबत बैठक घेवून तसेच प्रत्यक्षात भेटी देवून बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र ठेकेदाराने व फलटण आगाराने या सूचनांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली आहे.
विधान परिषद, विधानसभा, नगरपालिकेसह जिल्हा परिषदेतही सर्वत्र फलटणमधील सत्ताधारी असताना फलटण बसस्थानकातील प्रवाशांचे मात्र हाल कायम आहेत. एकाही माई च्या लालला फलटणच्या बसस्थानकाबाबत पान्हा फुटलेला नाही. फलटण बसस्थानकातील खड्ड्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच लहान मुलांचे हाल या राज्यकर्त्यांना दिसत नाहीत काय? बसस्थानकातील स्वच्छतागृहाचे सांडपाणी आजही या परिसरात उघड्यावर वाहत असते. त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. फलटण शहरात नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. त्याचबरोबर फलटण बसस्थानकात सुरु असलेला बेबंद कारभार बंद करुन त्वरित सुरु असलेले हे बांधकाम पूर्ण करावे. अन्यथा फलटण बसस्थानक राज्यात अव्वल म्हणून गौरविण्यात आलेले फलटण आगार व्यवस्थापक तसेच फलटण तालुक्यातील राज्यकर्त्यांच्या विरोधात निषेधाचे फलक लावणार असल्याचा इशारा फलटण तालुक्यातील संतप्त प्रवाशांनी दिलेला आहे.
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |