सातारा : सातारा शहरानजिक असलेल्या वनवासवाडी येथील शेतजमिनीबाबतचे कोर्ट मॅटर मिटवून घेण्यासाठी पुसेगाव येथील राजकुमार जाधव याला जीवे मारण्याची धमकी देऊन 16 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात मोक्का अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा येथील प्रसिध्द व्यापारी सुनील लक्ष्मीनारायण झंवर याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्याला पोलिसांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री सातारा येथून अटक केली. त्याची तब्येत बिघडली असून, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील जेल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.
तपास अधिकारी तथा सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, सातारा शहरानजिक असलेल्या वनवासवाडीमध्ये सर्जेराव दत्तू माने यांची शेत जमीन आहे. या जमिनीबाबत कोर्टमॅटर सुरु असून, ते मिटवून घेण्यासाठी कु‘यात गुंड दत्ता जाधव याने साथीदारांसह दबाब आणला होता. ऑक्टोबर 2017 मध्ये मंगेश चंद्रकांत सावंत याने माने यांचे मेहुणे राजकुमार जाधव, रा. पुसेगाव यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्यानंतर 12 ते 13 दिवसांनी दत्तात्रय उर्फ दत्ता रामचंद्र जाधव, चंद्रकांत विष्णू सावंत, मंगेश चंद्रकांत सावंत, प्रदीप धोंडीराम घाडगे, विजय उर्फ भेज्या भालचंद्र वाघमारे आणि खली उर्फ कृष्णा हणमंत बडेकर यांनी कट रचून इनोव्हा कार क्र. एम. एच. 11-सी. बी.-0302 व स्कॉर्पिओ जीप क्र. एम. एच. 11-ए. डब्ल्यु- 2 मधून पुसेगाव येथे जाऊन राजकुमार जाधव यांना माने यांचे जमिनीबाबतचे कोर्ट मॅटर मिटवून घेण्याच्या कारणावरुन 16 लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर अनेकदा समक्ष आणि ङ्गोनवरुन जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत दमदाटी केली होती.
राजकुमार जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुसेगाव पोलीस ठाण्यात यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सर्वच आरोपींना मोक्का लावण्यात आला असून त्यापैकी दत्तात्रय रामचंद्र जाधव, प्रदीप धोंडीराम घाडगे, विजय उर्फ भेज्या भालचंद्र वाघमारे व खली उर्फ कृष्णा हणमंत बडेकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, सध्या ते कारागृहात आहेत. चंद्रकांत सावंत व मंगेश सावंत हे अद्याप फरारी असून, त्यांचा शोध सुरु आहे.
मोक्का नुसार गुन्हा दाखल झाल्याने या गुन्ह्याचा तपास सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये सातारा येथील प्रसिध्द व्यापारी सुनील लक्ष्मीनारायण झंवर याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यादृष्टीने अनेक बारकावे तपासण्यात आले, चौकशी करण्यात आली. झंवर याचा सहभाग निश्चित असल्याने बुधवारी त्याला अटक करण्याचे निर्देश सातारा ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड यांनी दिले होते. त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सातारारोड पोलीस औट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार कमलाकर कुंभार, पोपट बिचुकले यांच्या पथकाने बुधवारी रात्री सातारा येथे जाऊन सुनील झंवर याला अटक केली. वैद्यकीय तपासणीवेळी अस्वस्थ वाटत असल्याचे झंवर याने सांगितले, त्यानुसार तपासणी करुन त्याला सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारासाठी जेल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंर सुनील झंवर याला मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |