04:58am | May 27, 2019 |
वाठार स्टेशन : वाठार स्टेशन हद्दीत व निष्णाई पेट्रोलपंपा जवळ आज सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि ट्रॅव्हल्स यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार MH 04 GP 9570 ही ट्रॅव्हल्स कोल्हापूर वरून २८ दिवसाच्या तीर्थक्षेत्र दर्शनासाठी निघाली असता पुण्याहुन कोल्हापूरकडे जाणारा माल ट्रक MH 12 LT 9962 हे आज सकाळी सहाच्या सुमारास वाठार स्टेशनच्या हद्दीत निष्णाई पेट्रोलपंपा जवळ आले असता सामोरासमोर या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीररीत्या जखमी झाले.
या भीषण धडकेत ट्रकची केबिन लक्झरी च्या केबिन मध्ये शिरून ड्रायव्हरच्या वरील बाजूस बाल्कनी सीटवर झोपलेला सागर भरत कमाने (वय 21) रा.उंब्रज याच्या डोक्यात शिरलेल्या ट्रकच्या अँगल मुळे डोक्यास गंभीर दुखापत झाली होती त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात सातारा येथे हलवण्यात आले परंतु तो त्या ठिकाणी मयत झाला. लक्झरीच्या भिषण धडकेत स्टेरिंगच्या रॉड व बोनेट मध्ये अडकलेला ट्रक ड्रायव्हर विजय बाबुराव वैरागर रा.केडगाव चौफुला याचाही उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यालाही मोठ्या कसरतीने पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने जेसीबी व ट्रॅक्टर च्या द्वारे बाहेर काढण्यात आले असून पुढील उपचारासाठी सातारा येथे यशवंत रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच लक्झरी मधील गंभीर जखमी झालेल्यांची नावे सूर्यकांत जगन्नाथ जाधव रा.उंब्रज, पांडुरंग शंकर घाडगे रा.बोरगाव, यामध्ये दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यापैकी शांताबाई पांडुरंग घाडगे रा.बोरगाव वैजंता तानाजी पवार रा.मनेराजुरी, शोभाताई मनोहर कुंभार रा. मळणगाव,आक्काताई सदाशिव कुंभार रा.मळणगाव,आशिष कुमार केदार मल्लाप्पा रा.मुळशी,प्रभावती बाबुराव कुंभार रा.मळणगाव,तानाजी दत्तू पवार रा.मनेराजुरी,रजनीकांत कैलास कांबळे (लक्झरी ड्रायव्हर रा.कोल्हापूर,)अनिल किसन शिंदे रा.उंब्रज,वैजंता जगन्नाथ जाधव रा.उंब्रज या सर्व जखमींना 108 नंबरच्या ऍम्ब्युलन्सने वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी पाठवले
यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. वाठार स्टेशन पोलिसांनी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून वाहतूक सुरळीत केली. तसेच या अपघातावेळी तडवळेचे पोलीस पाटील बापू ठोंबरे, आधार चॅरिटेबल ट्रस्टचे कमलाकर भोईटे, तडवळे येथील शशिकांत जाधव,मयूर सावंत, योगेश भोईटे, सौरभ भोईटे व अन्य युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली. तसेच वाठार स्टेशन पोलिसांना या अपघातप्रसंगी सहकार्य केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |