कराड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, शिवसेना, कॉंग्रेस या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात कराड उत्तरचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील हे पहिल्यांदाच कराड शहरात येत असल्यामुळे भव्य मिरवणुकीचे दि. 5 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आयोजन करण्यात आले आहे.मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी दत्त चौकात यावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे रौप्यमहोत्सवी आमदार असणारे बाळासाहेब पाटील आता नामदार झाले आहेत. रविवार दि. 5 जानेवारी रोजी नामदार बाळासाहेब पाटील कराडमध्ये दाखल झाल्यानंतर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मिरवणूक (रॅली) दत्त चौकातून सुरू होणार असून दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन दुपारी 3 वाजता मिरवणुकीस (रॅलीस) प्रारंभ होणार आहे. कराड शहराच्या मुख्य बाजारपेठेतून दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक मार्गे प्रितीसंगमावरील आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन नामदार बाळासाहेब पाटील घेणार आहेत. प्रीतीसंगमावरून परत चावडी चौक मार्गे मंगळवार पेठेतील आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या निवासस्थानी येऊन आदरणीय स्व. पी .डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेस आमदार बाळासाहेब पाटील अभिवादन करणार आहेत. यानंतर उपस्थितांचे आभार नामदार बाळासाहेब पाटील मानणार येणार आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |