12:18am | Jul 15, 2018 |
महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरात मुसळधार पाउस, सोसाटयाचा वारा, दाट धुके आणि अंधार या प्रतिकूल परिस्थितीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पोलिस वसाहती जवळ असेलेल्या पालिकेच्या महात्मा फुले मार्केट या व्यापारी संकुलातील तीन पतसंस्था फोडून दोन पतसंस्थां मधील सुमारे 5 लाख 20 हजार 589 रूपयांची रकमेवर डल्ला मारून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली. दरम्यान महाबळेश्वर शहरात पतसंस्था फोडण्याची ही शहाहरातील पहीलीच घटना आहे. चोरीच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांना चोरट्यांचे फुटेज मिळून आले आहे. त्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांची पथके तैनात केली आहेत. छ. शिवाजी चौकात पासुन हाकेेच्या अंतरावर वन विभागाच्या कार्यालया समोर व महाबळे-रु39यवर तापोळा रस्त्यावर पालिकेचे महात्मा फुले मार्केट हे व्यापारी संकुल आहे या संकुला समोर माखरीया हायस्कुल आहे संकुलातील व्यापारी गाळयांमध्ये एका बाजुला साई नागरी सह पतसंस्था व श्री गोटेनिरा जन्नीमाता बिगर शेती सह पतसंस्था या दोन व पाठीमागील बाजुस जनता नागरी सह पतसंस्था अशा एकुण तीन सहकारी पतसंस्था आहेत. गेली अनेक वर्षांपासुन ही त्यांची कार्यालये येथे आहेत. महाबळश्वर येथे सध्या मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले की, सोसाटयांचा वारा सुटतो तसेच दाट धुके आणि अंधार अशा प्रतिकुल संधीचा फायदा उठवत चोरट्यांनी एकाच रात्रीत शेजारी असलेल्या तीन पतसंस्था फोडल्या. चोरट्यांनी एकाच रात्रीत पतसंस्था फोडल्याची वार्ता महाबळेश्वर शहरात वार्यासारखी पसरली. मात्र महाबळेश्वरमध्ये चोरीची ही पहिलीच मोठी घटना घडल्याने नागरीकांचा विश्वासच बसत नव्हता.
तीन पतसंस्था फोडल्याचे समजताच महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पथक आणि पतसंस्थेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी या तीन्ही पतसंस्था फोडण्यासाठी एक्साब्लेड आणि कटावणीचा वापर केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी प्रथम साई नागरी सह पतसंस्थेचे शटर कटावणीच्या सहाययाने तोडून शटर वर करून चोरटे आत गेले परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. परंतु या पतसंस्थेचे सर्व कपाटे त्यांनी उघडुन पाहीली त्या मधील दस्तऐवज अस्ताव्यस्त फेकुन देण्यात दिले होते. एका कपाटाच्या कप्प्यात असलेले दहाचे 15 ते 20 डॉलर आणि चांदीचा एक साई पतसंस्थेचा शिक्का होता परंतु चोरटयांनी त्याला हात लावला नाही. यावेळी चोरट्यांची एक बॅटरी पतसंस्थेतच विसरली होती ती पोलिसांना मिळून आली. साई पतसंस्थेत शेजारीच श्री गोटेनिरा जन्नीमाता बिगर शेती सह पतसंस्था आहे. या पतसंस्थेच्या कार्यालयाला दोन टाळे लावले होते. ते टाळे चोरटयांनी तोडुन आत प्रवेश केला.
या पतसंस्थेतील दोन कपाटातील सर्व सामान त्यांनी बाहेर फेकले. या कपाटात चोरट्यांच्या हाती 1 लाख 85 हजार 249 रूपयांची रोकड लागली. यानंतर चोरट्यांनी या दोन पतसंस्थांच्या मागील बाजुस जनता नागरी सह पतसंस्था आहे. या संस्थेचे दोन गाळे आहेत परंतु एकाच गाळयावर पतसंस्थेचा फलक आहे असे असतानाही त्यांनी फलक नसलेल्या गाळा कटावणीच्या सहकार्याने तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. त्यांनी पतसंस्थेला लावलेली दोन कुलपे एक्साब्लेडने कापली व नंतर पतसंस्थेत प्रवेश केला. या पतसंस्थेत देखिल सर्व सामान उलथे पालथे केले. त्यांनतर चोरट्यांच्या हाती एक लॉकर असलेले ड्रॉव्हर सापडले. त्यातील 3 लाख 35 हजार चोरटयांनी डल्ला मारून पोबारा केला.
पोलीसांनी सर्व संस्थाचे सीसीटीव्ही तपासून पाहिले तर तीन संस्थापैकी जनता नागरी सह पतसंस्थेचा सीसीटिव्ही कॅमेरा चालु होता. या सीसीटिव्ही च्याफुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये दोन चोरटे मध्येरात्री तीन वाजता पतसंस्थेत घ्ाुसल्याचे दिसत आहेत. या चोरटयांनी पावसाळी रेनकोट घातला आहे. तोंडावर माकडटोपी घातली आहे त्या मुळे चोरटयांचे केवळ डोळे दिसत आहेत. एका चोरटयाच्या हातात मोठा एक्साब्लेड मोठी लोखंडी कटावणी, व एक रक्कम भरून घेवुन जाण्यासाठी पिशवी असे सामान असल्याचे दिसत आहे. एक चोरटा कपाटे शोधत आहे जे सापडेल ते तो दुसर्या चोरटयाकडे देवुन ते पिशवीत ठेवत होता, असे दिसत आहे. पोलीसांनी घटनास्थळी ठसे तज्ञांना व श्वान पथकाला पाचारण केले होते. महाबळेश्वर मधील प्रतिकूल परिस्थितीमुळे श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. तर ठसे तज्ञांनाही फारसे ठसे मिळाल्याचे समजते. या पतसंस्थामधील चोरीच्या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली असून तपास पो. उप. निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली अशोक काशिाद व श्रीकांत कांबळे हे करीत आहेत
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |