03:11pm | Jan 25, 2019 |
सातारा : फलटण शहरासह तालुक्यात व पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणार्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) पर्दाफाश करुन दोघांना अटक केली. पोलिसांनी संशयितांकडून दोन दुचाकी व जबरी चोरी करुन आणलेला मोबाईल जप्त केला असून आणखी काही चोर्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अक्षय बाळासाहेब वावरे (वय 19, माळेगाव येळेढाळे वस्ती) व किरण नामदेव लकडे (वय 19, रा.पाणदरे, मानाजीनगर दोन्ही ता.बारामती, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फलटण शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून जबरी चोर्या, दुचाकी चोर्याची घटना वाढल्या आहेत. सातारा एलसीबीचे पथक गोखळीपाटी ता.फलटण येथे गस्त घालत होते. यावेळी दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून लायसन व गाडीची कागदपत्रे मागितली असता ते गडबडले. पोलिसांनी संशयित दोघांची नावे घेवून त्याबाबत अधिक माहिती घेत असता ते सराईत चोरटे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी व मोबाईल जबरदस्तीने माळेगाव ता.बारामती व जेजुरी येथून चोरुन आणल्याची कबुली दिली.
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून दोन दुचाकी व एक मोबाईल असा एकूण 94 हजार 150 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. संशयितांच्या टोळीमध्ये आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान, संशयितांचा ताबा पुणे ग्रामीण पोलिसांकडे दिला जाणार आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रसन्न जर्हाड, पोलिस हवालदार आनंदराव भोईटे, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, विक्रम पिसाळ, संजय जाधव, विजय सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |