01:52am | Jul 25, 2019 |
सातारा : पोलिस युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिल सुभाष पवार (वय 27, रा.100 फुटी रोड, विश्रामबाग, सांगली, मूळ रा.लासूर ता.चोपडा जि.जळगाव) या सांगली पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार युवती पोलिसाने याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, पोलिसावरच फसवणूक व बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार युवती 22 वर्षाची आहे. ती सध्या पोलिस म्हणून कार्यरत आहे. पोलिस युवतीची व अनिल पवार याच्याशी ओळख आहे. संशयिताने या ओळखीचा गैरफायदा घेवून युवतीवर प्रेम करतो व लग्न करायचे असल्याचे सांगितले. त्यातूनच पोलिसाने युवतीला सांगली येथे बोलवले व सांगली स्टँडसमोरील एका लॉजमध्ये जबरदस्तीने बलात्कार केला. बलात्कारानंतर संशयिताने ‘पोलिस युवतीला लग्न करतो असे वचन दिले.’ काही दिवसानंतर यातून संशयिताने पोलिस युवतीकडून घर बांधण्यासाठी 50 हजार रुपये घेतले.
अशाप्रकारे दोघांमध्ये संपर्क वाढत जात असताना पोलिस युवतीने अनिल पवार याला लग्नाबाबत विचारले. त्यावेळी ते दोघे पंढरपूर येथे बंदोबस्ताला होते. अनिल पवार याने लग्नाबाबत घरचे परवानगी देणार नाहीत असे सांगून त्याने नकार दिला. लग्नाला नकार दिल्यानंतर संशयिताला पैसे मागितले असता त्याने पैसे देण्यासही नकार देवून पोलिस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली.
दरम्यान, संशयित अनिल पवार या पोलिसाच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही पोलिस युवतीला दमदाटी, शिवीगाळ केली आहे. बलात्कार व फसवणूक झाल्याने युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सांगली पोलिस दलात कार्यरत असणार्या अनिल पवार याच्यासह त्याच्या कुटुंबियांविरुध्द गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास महिला फौजदार वर्षा डाळींबकर करत आहेत
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |