कराड : दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा तलाठी यांच्याकडून मिळवून देतो असे सांगून तलाठ्याच्या मदतनीसाला साडेतीन हजार रूपयाची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज (शुक्रवारी) काशीळ ग्रामपंचायत इमारतीतील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
गजानन बाळासाहेब माने (वय 30 रा.काशिळ ता.जि.सातारा) असे लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तलाठ्याच्या मदतनीसाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांच्या दस्ताची नोंद करून तसा तलाठ्याकडून सातबारा उतारा देण्यासाठी मदतनीसाने तक्रारदार यांच्याकडून 4 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती नोंदीचा उतारा देण्यासाठी साडेतीन हजार रूपये निश्चित करण्यात आले. दरम्यान तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार आज (शुक्रवारी) काशीळ येथील ग्रामपंचायत इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचना यावेळी तक्रारदार यांच्याकडून साडेतीन हजार रूपयांची लाच स्विकारताना तलाठ्याचा मदतनीस गजानन माने यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, पो. ना. राजे, ताटे, पो. कॉ. खरात, पो. कॉ. सपकाळ यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |