12:53am | Jan 11, 2020 |
सातारा : मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यास मिळालेला निधी खर्च करण्यासाठी आढावा घेतला असून, कोणत्याही परिस्थितीत निधी मागे जावू दिला जाणार नाही . येत्या 27 तारखेला वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रादेशिक आराखडा बैठक होत असून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही वित्त व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मंत्री देसाई यांनी वित्त, राज्य उत्पादन शुल्क, पणन, कौशल्य विकास आदी विभागांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""मार्च महिन्यास दोन महिने राहिले असून, अखर्चित निधी खर्च होण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दोन-तीन विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांचा निधी मार्गी लागला आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात निधी वाढवून मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.''
जिल्हा बॅंकेचे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत शिवसेनेची भूमिका काय असणार या प्रश्नावर ते म्हणाले, ""राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते खाली यावे, हे माझे मत आहे. वरिष्ठांची चर्चा करून ते जसे आदेश देतील, तसे काम करणार आहे.''
बाजार समित्या भक्कम करणयासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार आहे. बाजार समित्यांत काय अडचणी आहेत, त्याची कारणे काय हे अभ्यासून त्यात सुधारणार केल्या जातील.
पवारांचा कौशल्य विकासावर भर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यास गेलो. तेव्हा त्यांनी कौशल्य विकासवर विशेष भर देण्यास सांगितले. आयटीआयचे पारंपारिक कोर्स बदलून कंपन्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी सकाळीच माझी भेट घेतली. त्यांच्याबरोबर कौशल्य विकास वाढीसाठी प्रयत्न करता येतील का, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री. देसाईंनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |