03:55pm | Jul 09, 2019 |
कराड : विविध विभागांमार्फत तालुक्यात सुरू असणारी कामे, शासनाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, तक्रारी यावर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र कराड पंचायत समितीची मासिक सभा सोसोच झाली. शिक्षण विभाग वगळता कोणत्याच विषयावर चर्चा घडली नाही. अपवादात्मक सदस्य सोडले तर अन्य सदस्यंानी सभागृहात नेहमीप्रमाणे केवळ हजेरी लावली.
सभापती फरीदा इनादार यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार उपस्थित होते.
तालुक्यात सुरू असणार्या विविध कामांच्या प्रगतीची माहिती महिन्यातुन एकदाच सभागृहात सदस्यांना मिळते. यावर बाधक चर्चा अपेक्षित असते. पण सदस्यंाचे मौन काही सुटत नाही. ठरावीक सदस्य सोडले तर अन्य सदस्य सभागृहात ब्रशब्दही काढत नाहीत. ज्या मतदार संघातुन ते निवडुन आले त्या भागतील प्रश्नही कधी त्यांच्याकडुन उपस्थित होताना दिसले नाही. शुक्रवारीच्या सभेतही तोच अनुभव आला. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण रूग्णालय, रोपवन, लघुसिंचन, वीज कंपनी, कराड आगार, जीवन प्राधीकरण, उपनिबंधक, भूमी अभिलेख अशा डझनभर अधिकार्यंानी सभेला दांडी मारली. जे अधिकारी उपस्थित होते त्यांनी आढावा देवुन कशीबशी वेळ मारून नेली.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. रोगराई, दुषित पाणी, साथीचे आजार पसरण्याची भीती असते. त्या अनुषंगाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे का? वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्राच्या ठिकाणी मुक्कामी राहतात का? असे अनेक प्रश्न असताना सभागृहात या गंभीर विषयावर सदस्यांनी चर्चाच केली नाही. कृषी विभागाच्या आढावा दरम्यान हिच परिस्थिती होती. खरीपाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्यांसमोर खते,बियाणांपासुन अनेक अडचणी आहेत. पण त्यांचे प्रतिनिधीत्व करणार्या एकाही सदस्यांने शेतकर्यंाचे प्रश्न सभागृहात मांडू नयेत याला काय म्हणावे. ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम विभागाचे अधिकारी आले आणि आढावा देवुन गेले. या विभागावरही चर्चा झालीच नाही. शिक्षण विभागाच्या आढावा दरम्यान कवडेवाडी शाळेवर हजर होण्यासाठी गेलेले शिक्षक शिवाजी ठोंबरे यंाना आजारी असतानाही केंद्र प्रमुखांनी हजर करून घेण्यास असमर्थता दाखविल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दोन सदस्यीय समिती नेमुन चौकशी करावी, असा ठराव ऍड.शरद पोळ यांनी मांडला. तर मासिक सभेस सुचना करूनही गैरहजर राहणार्या अधिकार्यंाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव सदस्य चंद्रकांत मदने यंानी मांडला. हे दोन विषय वगळता सभेचे कामकाज सोसोच झाले.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |