सातारा : सातारा ही छत्रपती शिवरायांची राजधानी आहे. याठिकाणी प्रशासकीय कामकाज करताना अनेकांनी योगदान दिले आहे. पण,काल सातारा तहसिलदार सौ आशा होळकर यांनी दुर्गम भागातील एका शेतकर्यांच्या शेतात हातात कासरा घेऊन नांगरट केली. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला गेला.
याबाबत माहिती अशी की, शासन आपल्या दारी योजनेंतर्गत राजस्व अभियान सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा तालुक्यातील दुर्गम भागातील जळकेवाडी, धावली, पंजाळवाडी, भांबवली, तांबी, जुगँटी, अलवडी, बांबरवाडी या छोट्याशा खेडेगावात शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, सातारा तहसिलदार सौ आशा होळकर, गट विकास अधिकारी ढमाळ, पुरवठा शाखेचे संतोष दळवी व परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. या सर्वांना वृक्षारोपण, स्वछता, कुर्हाडबंदी, व्यसनमुक्ती व लेक लाडकी अभियान तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. काहींचे प्रश्न तातडीने सोडविले. यामुळे शासन आपल्या दारी आल्याचा अनुभव सर्वांना आला.
या शासकीय कार्यक्रमानिमित्त तहसिलदार सौ होळकर आल्या होत्या. जळकेवाडी-धावली येथील एका शेतात बैलजोडीने नागरटीचे काम सुरू होते. तिथे दस्तुरखुद्द तहसिलदार पोहोचल्याने शेतकर्याच्या मनात काही क्षण काहूर माजले. पण,जेव्हा,सौ होळकर यांनी बैलजोडीचा कासरा हाती घेऊन नांगरट सुरू केली तेव्हा शेतकर्याच्या या लेकीचे कौतुक सुरू झाले. महात्मा फुले, शिक्षणमाता सावित्रीमाई फुले यांनी स्रियांना शिक्षणाचे कवाड खुले केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क मिळवून दिला. त्याचे फळ म्हणून आज महिला आपल्या हाताने आदेश काढतात तसेच काळ्या आईची म्हणजे शेत जमिनीची सेवा करू शकतात हे एका कर्तबगार महिलेने दाखवून दिले आहे. त्याचे सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |