04:27pm | May 15, 2019 |
कराड : गाडीतील टेप लावून नाचता असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन सराईत गुन्हेगारांनी राडा केला. चार चाकीसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत लोखंडी गज, हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तिघे जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी सहा जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 13 रोजी रात्री ही घटना घडली.
दत्ता कोळेकर (रा. मुनावळे, ता. कराड) व सचिन घाडगे (रा. कालेटेक, ता कराड) यांच्यासह इतर चार जणांवर (नावे समजू शकली नाहीत) कराड तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांनी केलेल्या मारहाणीत रोहित कमलाकर यादव हा गंभीर जखमी झाला असून त्याचा भाऊ योगेंद्र कमलाकर यादव (वय 27, रा. नारायणवाडी, ता. कराड) व आणखी एक जण जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, योगेंद्र व रोहित यांचे मुंबई व कराड येथील मित्र मुनावळे गावच्या हद्दीतील दरेनावाच्या शिवारात जेवण करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी चारचाकी वाहनातील टेप लावला होता व भोवती त्यांचे मित्र नाचत होते. दरम्यान, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे सर्व जण मित्र जेवण करीत असताना दत्ता कोळेकर व सचिन घाडगे यांच्यासह आणखी अनोळखी चौघेजण तेथे आले. त्यांनी 'एवढ्या रात्री टेपचा आवाज कशाला मोठा केला आहे. तुम्हाला आता जिवंत ठेवणार नाही,' असे म्हणून लोखंडी रॉड, लाकडी दांडके व हॉकी स्टिकने रोहित यादव व योगेंद्र यादव यांच्यासह त्यांच्या मित्रांना जबर मारहाण केली. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून असून रोहित यादव हा गंभीर आहे. त्यानंतर संशयीतांनी तेथील चार चाकी व दोन चाकी वाहनांची ही तोडफोड करून ते सर्वजण तिथून पळून गेले.
दरम्यान, संशयितांनी केलेल्या मारहाणीत रोहित यादव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला योगेंद्रसह त्याच्या मित्रांनी कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. योगेंद्र यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता कोळेकर व सचिन घाडगे यांच्यासह आणखी चौघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, दत्ता कोळेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कराड शहर तसेच इतर पोलिस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. कराड तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संशयितांचा शोध घेतला असता ते पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना मदत करणाऱ्या दोघांना मध्यरात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |