01:07am | Dec 11, 2019 |
सातारा : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे क्रांतीकारक साहित्य परिवर्तनाचे हत्यार आहे. या थोर पुरुषाची महाराष्ट्राने घोर उपेक्षा केली आहे. जातीधर्माच्या चौकटीत, वादात अडकवून त्यांना आणखी संकुचित करु नका, असे आवाहन दलित चळवळीचे अभ्यासक डॉ. शरद गायकवाड यांनी केले.
संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या 33 व्या थोरांच्या स्मृती - व्याख्यानमालेत परिवर्तनाचे दीपस्तंभ मधील ' लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य व समाजक्रांतीचे योगदान ' या विषयावर ते बोलत होते. डॉ. गायकवाड यांचा रशियातील मॉस्को येथे पार पडलेल्या अण्णा भाऊ साठे जागतिक संमेलनातील सहभागाबद्दल प्रारंभी सत्कार करण्यात आला. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे,उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, विश्वस्त प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
डॉ. शरद गायकवाड म्हणाले, अण्णा भाऊंनी आत्मचरित्र लिहायचे ठरवले होते. मात्र त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्यामुळे त्यांचे आणखी अनेक पैलू उजेडात येऊ शकले नाहीत. लेखन परंपरेचा पुर्वसुरींचा कोणताही वारसा नसताना व केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊंनी शोषित, श्रमिक, वंचितांच्या रक्त, अश्रू व घामाची महती गाणारे प्रचंड साहित्य लेखन केले आहे. यासाठी त्यांना आधुनिक एकलव्यच म्हटले पाहिजे. त्यांच्या साहित्यावर चित्रपट निघाले. ते काढणार्या निर्मात्यांनी व अनेक कादंबर्या प्रसिद्ध करणाऱ्या प्रकाशकांनी त्यांची आर्थिक फसवणूक करून स्वतःच्या माड्या बांधल्या.
प्रसिद्ध रशियन लेखक मँक्झिम गाँर्की हे अण्णा भाऊंचे लेखन गुरु होते. प्रृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नव्हे तर श्रमिक ,कष्टकरी,दलितांच्या हातावर तरली आहे, असे सांगणार्या अण्णा भाऊंनी मार्क्स, फुले, आंबेडकर यांचा सत्यशोधक चळवळीचा वारसा चालवून मानवतेचा पुरस्कार केला आहे. हैद्राबाद, गोवा मुक्ती तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे फार मोठे योगदान आहे.
प्रकाश गायकवाड यांनी प्रस्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. कोल्हापूर कांडगाव येथील रयत सेवक जयवंत महादेव कांबळे, बाबर सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |