नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल दरवाढीची चढती कमान कायम असताना आणि केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात घट करून उतारा मिळत नसतानाही, गेल्या आठ दिवसांत चार राज्यांनी पेट्रोल, डिझेल दरात कपात करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थानपाठोपाठ कर्नाटक सरकारने इंधन दरात कपात जाहीर केली. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ कायम ठेवल्याने महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 90 रुपयांच्या वर गेले आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीची चढती कमान कायम असून, सोमवारच्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे लिटरचे दर82.06 रुपयांवर गेले आहेत. मुंबईत हेच दर 89.44 रुपयांवर गेले आहेत. दरम्यान, कर्नाटक सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी घट केल्याने कर्नाटकमधील नागरिकांना किंचित दिलासा मिळाला. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून इंधन दरात वाढ केली जात आहे. पेट्रोलच्या दरात आज 15 पैशांची वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात सहा पैशांची वाढ करण्यात आली असून, दरवाढीनंतर दिल्लीत डिझेलचे लिटरचे दर 73.78 रुपयांवर गेले आहेत. मुंबईत हेच दर 78.33 रुपयांवर गेले आहेत. पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ अशीच चालू राहिली, तर आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असा इशारा योगगुरू रामदेवबाबा यांनी नुकताच दिला होता. इंधन दरातील सातत्यपूर्ण वाढीमुळे सर्वसामान्यांचा खिसा रिकामा होत असून, आगामी निवडणुकांत त्याचे कसे पडसाद उमटतात, याकडे राजकीय विश्लेषकांचेही लक्ष लागले आहे.
राज्यातील 16 जिल्ह्यांतील पेट्रोलचे दर (रुपयात) असे
परभणी................ 91.28
नांदेड .................. 91.09
अमरावती.............. 90.78
नंदूरबार ................90.69
बुलडाणा .............. 90.66
औरंगाबाद ............. 90.58
रत्नागिरी ............... 90.54
जळगाव ................90.48
गोंदिया................. 90.38
जालना ................ 90.35
हिंगोली ................ 90.30
लातूर................... 90.29
बीड.................... 90.27
सोलापूर ............... 90.12
सातारा .................90.01
वाशीम ................ 90.01
चार राज्यांनी घटवलेले दर प्रतिलिटर
आंध्र प्रदेश : 2 रुपये , पश्चिम बंगाल :1 रुपये, राजस्थान : 2.5 रुपये , कर्नाटक : 2 रुपये
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |