02:51am | Oct 07, 2019 |
सातारा : मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच मी पक्षांतर केले आहे. माझ्या मतदारसंघाचे हित जोपासण्यासाठी व जनतेचे प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याने योग्य वेळी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जावली मतदारसंघाचा कायापालट करणे हेच माझे ध्येय असून आगामी काळात त्याचा प्रत्यय येईल, असा शब्द भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारांना दिला.
मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा झंझावाती प्रचार सुरु असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांचे हजारो कार्यकर्ते प्रचारात दिवसरात्र एक करत असून ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. त्यांना जनतेमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आज दिवसभरात शिवेंद्रसिंहराजे आणि पदाधिकाऱ्यांनी परळी भाग पिंजून काढला. गावभेटीदरम्यान मतदारांशी सवांद साधताना शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्ष बदलामागची भूमिका स्पष्ट करून भविष्यात केल्या जाणाऱ्या विकासकामांची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, भिकूभाऊ भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष अभय पवार, संजय भंडारे, बबन देवरे, प्रकाश जाधव, कमल जाधव, विद्याताई देवरे, चंद्रकांत वांगडे,जयराम चव्हाण,गजानन दळवी, शांता जंगम, अशोक कोठावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण मतदारसंघातील लोकांशी व्यक्तिगत आणि घरोब्याचे संबंध असल्याने माझ्या मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण मतदारसंघात आतापर्यंत असंख्य विकासकामे केली आहेत आणि पुढील पाच वर्षात माझ्या मतदारसंघाचा कायापालट करणार आहे. सत्ता व संघर्षाशिवाय विकास नाही. आपल्याजवळ जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे. हेच ध्येय बाळगून मी वाटचाल करीत आहे. तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रत्येक गट पुढे नेहणे माझे धोरण आहे. सत्तेच्या विरोधात राहून आपले नुकसान करणे तोट्याचे आहे.आता घड्याळ विसरून बाजूला ठेवा आणि कमळा समोरील बटन दाबून आम्हा दोघांना बहुमताने निवडून द्या. पुढे सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक मोठी विकासकामे मार्गी लावून मतदारसंघाचा कायापालट करणार आहे. यासाठी निवडणुकीपुरत्या उगवणाऱ्या नेत्यांच्या भूलथापांना बाली पडू नका. कमळाला म्हणजेच मला बहुमतांनी निवडून द्या आणि विकासाला साथ द्या, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
संजय भंडारे म्हणाले, बाबाराजेंनी योग्य वेळी घेतलेला विचारपूर्वक निर्णय चांगला आहे.सर्वांनी एकमुखाने निर्णय घेऊन शंभर टक्के भाजपाला मतदान करा. मतदानाने बाबांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,त्याचे सोने करा. कार्यकर्त्यांनी तहानभूक विसरून कामे केल्यास सर्व काही शक्य आहे.
अभय पवार म्हणाले, बाबाराजे जे बोलतात ते करूनच दाखवतात.लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रगतीसाठी वाटेल ते करणारे आहेत.त्यासाठी आपणा सर्वांची त्यांना साथ हवी आहे. बाबांनी तालुक्याच्या सर्वागीण विकासाचा ध्यास घेतला असून, त्यामध्ये ते कुठेही कमी पडणार नाहीत. शहर असो वा ग्रामीण भाग, विकासाची गंगा सर्वत्र बाबांनी पोहोचविली आहे. हाच विकास पुढे गतिमान ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहा.
याप्रसंगी यशवंत गंगावणे, डॉ. मुराद मुलाणी, सोमनाथ दळवी, सुधीर नायकवडी, सरपंच सौ.लताताई गोगावले, आनंदा गायकवाड, सुरेश घाडगे, यशवंत गोगावले, बाळासो पाटील, दिलीप निकम, नंदकिशोर पानसरे, गिरीश कोठावळे, जीवन पवार यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |