सातारा : सातारा शहरासह राज्यात खळबळ उडवून दिलेल्या 57 लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणात संशयित सहा युवकांनी पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात आणखी अधिक तपासाचा भाग म्हणून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास फौजदाराकडून पोनि चंद्रकांत बेदरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बुधवारी एलसीबीच्या पथकाने शुक्रवार पेठ, मोळाचा ओढा, मतकर कॉलनी येथून गणेश भोंडवे, अनिकेत यादव, अमोल शिंदे, अमेय बेलकर, राहूल पवार, सुनील राठोड (सर्व रा.सातारा शहर परिसर) यांना अटक करुन त्यांच्याकडून 2 हजार व 500 रुपयांच्या तब्बल 57 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. यातील गणेश भोंडवे याची गुन्हेगारी तर उर्वरीत उच्च शिक्षीत असल्याने पोलिसही चक्रावून गेले. सातार्यातील मध्यवर्ती ठिकाणी हे युवक बिनधोकपणे बनावट नोटा छापत असल्याचे समोर आल्यानंतर शुक्रवार पेठेत दिवसभर याचीच चर्चा सुरु होती.
दरम्यान, संशयितांनी आतापर्यंत एकूण किती बनावट नोटा छापल्या आहेत? सातार्यासाह अन्य कोणकोणत्या जिल्ह्यात व किती रुपये वितरीत केल्या आहेत? या टोळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे? असे सवाल उपस्थित असून पोलिसांचा तसा तपास सुरु असल्याचे सांगितले. अद्याप संशयितांची दोन दिवस पोलिस कोठडी शिल्लक असून अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यातून समोर येण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोनि चंद्रकांत बेदरे हे पुढील तपास करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |