12:54am | Feb 28, 2019 |
सातारा : नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते बुधवारी सायंकाळी सातार्यात दाखल झाल्यानंतर रात्री उशीरा पोलिस दलाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. सातारचा चार्ज घेताच त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. दरम्यान, जिल्ह्यात सात महिन्यांची काम करण्याची संधी मिळाली हे आपण भाग्य समजतो. आणखी काम करण्याची इच्छा होती, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मावळते पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना सर्वात कमी कालावधी मिळाला असल्याचे समोर आले आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, सात महिन्यांपूर्वी आपणला सातारा पोस्टींग मिळाल्याचा आनंद झाला होता. जिल्ह्याला सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, पर्यटण अशी सर्व बाबींची मोठी परंपरा आहे. सात महिन्यांमध्ये जिल्ह्याची चांगलीच माहिती झाली होती व कामाचा जम बसला होता. शेवटी काम हे काम असते. इथे दोन वर्षासाठी आलो होतो पण सात महिन्यांमध्ये जावे लागले. अर्थात सात महिने इथे काम काम करायला मिळाले, हे आपण आपले भाग्यच समजतो. सातार्यात काम करत असताना पोलिस दलातील सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी साथ दिली. पोलिस कर्मचार्यांमुळेच आपणाला जिल्ह्याची चांगली माहिती मिळाली व अपडेट राहता आले. पोलिस कर्मचारी माहितीबाबत व नेटवर्कबाबत स्ट्रॉंग असून सातारा पोलिस दलातील कर्मचार्यांचा हा गुण जबरदस्त असल्याचे गौरोद्गारही त्यांनी काढले.
मुंबईमध्ये लोकसभा संदर्भात ट्रेनिंगसाठी असताना बदलीची ऑर्डर झाली. शासनाच्या निर्णयाचा आदरच आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आपली बदली झाल्याने तेथे लवकरच हजर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतून सातार्यात आल्यानंतर ते थेट मुख्यालयात आले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी व मुख्यालयातील क्लेरीकल विभागातील कर्मचार्यांनी त्यांची भेट घेवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, नुतन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या सातार्यात सायंकाळी शिवतेज येथे उतरल्या. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आल्या आल्याच त्यांनी सातारा जिल्ह्याची व पोलिस दलाची माहिती घेण्यास सुरुवात केली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |