09:37pm | Jul 23, 2019 |
सातारा : शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एकात्मिक ऊर्जा विकास योजना व दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनांमधील नवीन वीजयंत्रणेची व जुन्या यंत्रणेच्या सक्षमीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.
वीजग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण, आधुनिकीकरणाची कामे सातत्याने केली जात आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या सहाय्यातून बारामती परिमंडलमधील एकूण 26 शहरी भागांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना (Integrated Power Development Scheme) तसेच ग्रामीण भागासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना राबविण्यात येत आहे.
बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, शिरूर, भोर, इंदापूर व पुरंदर या तालुक्यांमध्ये या दोन्ही योजनांची विविध कामे पूर्ण झाली आहे. यामध्ये 2 नवीन उपकेंद्र, 8 उपकेंद्रांची क्षमतावाढ, 129 उपकेंद्रांचे आधुनिकीकरण व नुतणीकरण, 633 नवीन वितरण रोहित्रे व क्षमतावाढ, 701 किलोमीटर लघु व उच्चदाब नवीन ओव्हरहेड व भूमिगत वीजवाहिनींचे कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ग्रामीण भागात दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून 10,473 नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील सातारा, रहिमतपूर, वाई, पांचगणी, महाबळेश्वर, कराड, मलकापूर, म्हसवड, फलटण या 9 शहरांमध्ये आयपीडीएस योजनेमधून वीज यंत्रणे विकास कामे करण्यात आली. यामध्ये महाबळेश्वर येथे नवीन 33/11 केव्ही सेमी जीआयएस उपकेंद्र उभारण्यात आले आहे. पूर्वी वेण्णालेक येथील उपकेंद्रातून महाबळेश्वर शहर व ग्रामीण भागाला वीजपुरवठा करण्यात येत होता. आता महाबळेश्वर शहरासाठी स्वतंत्र उपकेंद्र तयार झाले आहे. तसेच वेण्णालेक उपकेंद्रावरील वीजभार कमी झाल्याने शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा आणखी दर्जेदार झाला आहे. यासोबतच रहिमतपूर उपकेंद्र रोहित्राची क्षमतावाढ, 137 नवीन वितरण रोहित्र व क्षमतावाढ, 59 किलोमीटर लघु व उच्चदाब भूमिगत वीजवाहिनी अशी विविध कामे करण्यात आली आहेत.
यासोबतच ग्रामीण भागासाठी असलेल्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी उपकेंद्रात अतिरक्त पावर ट्रान्सफार्मर लावण्यात आला आहे. 133 किलोमीटरच्या उच्च व लघुदाब वाहिनी तसेच 50 नवीन वितरण रोहित्रांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतून सातारा जिल्ह्यातील 1022 बीपीएल व 3426 गरीब अशा एकूण 4448 कुटुंबांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तसेच कोंढवे (ता. सातारा), एनकूल (ता. खटाव) या संसद आदर्श गावांमध्ये या योजनेतून नवीन वीजयंत्रणा उभारण्याचे व वीजजोडण्यांचे काम करण्यात आले आहे.
या दोन्ही योजनांमधील कामांमुळे सातारा जिल्ह्यातील शहरी, निमशहरी तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम व आधुनिक झालेली आहे. त्यामुळे वीजग्राहकांना योग्य दाबासह सुरळीत वीजपुरवठा करण्यासोबतच नवीन वीजजोडण्या देण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |