02:29am | Nov 06, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यात शिक्षण केले असून इथे काम करायला खूप आवडेल. मोक्का, एमपीडीएसह विविध कारवाईचा धडाका पहिल्यासारखाच राहिल व मोक्कामध्ये जामीन होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न राहतील. तसेच आगामी निवडणुकांमध्ये कोणताही बाका प्रसंग निर्माण झाला तर आपण कायद्याच्या चौकटीतच निपटारु. तसेच सातारा जिल्ह्यात कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आपली समन्वयाची भूमिका असून प्रभावीपणे काम करणार असल्याचे नुतन अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांची इचलकरंजी येथून सातार्यात अप्पर पोलिस अधीक्षकपदी बढतीने बदली झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी जिल्ह्याचा चार्ज घेतला. सोमवारी त्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी वार्तालाप केला.
अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सुरुवातीला ते शिक्षक होते. 2009 साली ते एमपीएससी अंतर्गत पोलिस उपअधीक्षक (डीवायएसपी) झाले. ट्रेनिंग झाल्यानंतर आतापर्यंत त्यांनी चंद्रपूर, अहमदनगर, मिरज व इचलकरंजी येथे सेवा केली असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी जिल्ह्यातील निवडणुकाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी आपण सर्वच संवेदनशील ठिकाणी काम केले आहे. यामुळे आता कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला सामोरे जाण्याचा पाठीशी अनुभव आहे. जे कायदेशीर आहे तेच होईल.
मोक्का, झोपडपट्टीदादा, तडीपारबाबत म्हणाले, अप्पर पोलिस अधीक्षक या नात्याने आपला क्राईमचा महत्वाचा रोल येतो. त्याबाबत कोणाचाही मुलाहिजा बाळगणार नाही. पूर्वीप्रमाणेच या सर्व कारवाई अधिक प्रभावीपणे कशा राहतील हे पाहिले जाईल. मोक्कामध्ये जामीन मिळू नये, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. शहरासह जिल्ह्यात जी बेकायदेशीर हत्यारे सापडत आहेत त्याच्या मूळाशी जाणार. पोलिस बंदोबस्त ज्यांना दिलेला आहे त्याबाबत माहिती घेवून आढावा घेणार आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक हे पोलिस दलाचे प्रमुख असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच जिल्ह्यात आपण सहकार्यांसमवेत काम करणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांशी आपला संवाद अधिक अधिक वाढवून सर्वांशी समन्वय ठेवला जाईल, असेही नुतन अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |