11:59pm | Aug 29, 2018 |
कराड : रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील चिकुन गुनिया व डेंग्यू सदृश्य रूग्णांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. बुधवारअखेर सांधेदुखी व तापाने बाधीत नवीन २५ रूग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर बुधवारी हिवताप विभागाच्या जिल्हाप्रमुख जंगम, उपजिल्हा आरोग्य अधिकारी फाळके यांच्यासह हिवतापाचे मच्छर पकडणारे पथक दाखल झाले. मात्र, गावात डासांची अंडी व आळ्या पाहून त्यांनी हातच टेकले. गावात कोठेही जावा डासांची अंडीच अंडी आणि आळ्या निदर्शनास आल्याने ही साथ बळावत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
रेठरे बुद्रुक ता. कराड येथे जुलै महिन्यापासून ग्रामस्थांना चिकुन गुनिया सदृष्य साथीच्या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. शेकडोहून अधिक ग्रामस्थांना ताप, सांधेदुखी, उलटी मळमळ आदी त्रास होत होते. अनेक रूग्णांनी येथील प्रा. आ. केंद्रात प्रथमोपचार घेतले. मात्र, त्याचा फायदा न झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ७५ वर्षीय रूग्णाच्या रक्त नमुन्यात चिकुन गुनियासह डेंग्यूची टेस्ट आणि १५ वर्षीय मुलीची डेंग्यु टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी पाच तर बुधवारी नवीन सहा रूग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.बुधवारी हिवताप (मलेरिया) विभागाच्या जिल्हा हिवताप अधिकारी जंगम व त्यांच्या टीमसह जिल्हा उपआरोग्य अधिकारी व्ही. के. फाळके यांनी भेट देऊन तपासणी केली. या पथकात मास्कोडो कलेक्टर (हिवताप डासांची तपासणी करून पकडणारे) यांचा सहभाग होता. या तपासणीत डासांची अंडी व आळ्यापाहून त्यांनी डोक्यालाच हात लावला. यावेळी गावात डासांची अंडी व आळ्या मोठ्या प्रमाणात असल्याचे पथकाने सांगितले. या तपासणीवेळी सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शरद बागडे, आरोग्य अधिकारी डॉ. मैथिली मिरजे, डॉ. अनिता कदम यांच्यासह ग्रा. पं. सदस्यांनी स्वच्छतेचे आवाहन केले.
ग्रामस्थांचे सहकार्य नाही :
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांचे सहकार्य नाही. पाण्याच्या टाक्या पाहू दिल्या जात नाहीत. भांड्याला हात लावू दिला जात नाही. जोपर्यंत ग्रामस्थ सहकार्य करत नाही तोपर्यंत आम्ही तर काय करणार? अशी निराशा डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे चिकुन गुनिया सदृश्य रूग्णांच्या संख्येत वाढ होत असून साथ बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसात चिकून गुनिया सदृश्य २५ रूग्ण येथील प्रा. आ. केंद्रात उपचारासाठी नव्याने दाखल झाले आहेत. तसेच खाजगी रूग्णालयातील आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.
- डॉ. सुनिल कोरबू, तालुका वैद्यकीय अधिकारी
पंचायत करणार घरोघरी स्वच्छता :
रेठरे बुद्रुक येथे चिकुन गुनिया व डेंग्यू या साथीच्या आजाराचा प्रार्दुभाव झाला आहे. ही साथ आटोक्यात आणसाठी येथील गटर वाहती करण्यासह सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलून त्याची विल्लेवाट लावण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी सुध्दा कोरड दिवस म्हणून मंगळवार पाळवा. त्याच बरोबर पंचायतीचे कर्मचारी प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी जावून परिसराची व घरांची तपासणी करून डास उत्पत्ती होणारा कचऱ्याची विल्लेवाट लावण्याचा निर्णय आजच्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
- शरद गाडे , ग्रामविकास अधिकारी, रेठरे बुद्रुक
ग्रामस्थांनी सहकार्याची गरज :
रेठरे बुद्रुक येथे चिकुन गुनिया व डेंग्यू निर्मुलनासाठी ग्रामापंचायतीकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. गावची स्वच्छतेसह फॉगींगच्या सहाय्याने धुराची फवारणी सुरू आहे. या साथीच्या काळात ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाला ग्रामस्थांनी सहकार्य केले पाहिजे. तसेच आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करावे.
- सुवर्णा कापूरकर, सरपंच, रेठरे बुद्रुक
चार फॉगींग मशीन मागवली
रेठरे येथील चिकुन गुनिया व डेंग्यूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने जादा कुमक मागवली आहे. सध्या गावात एकाच फॉगींग मशीनने धुराची फवारणी केली जात आहे. मात्र गावाची व्याप्ती पाहता असून चार फॉगींग मशीन मागण्यात आली आहेत. यात कराड नगरपालिकेची दोन व जिल्हा हिवताप विभागाची दोन मशीनचा सहभाग असल्याचे डॉ. कोरबू यांनी सांगितले.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |