सातारा : वाई जवळील पसरणी घाटात वाई बाजूकडून पाचगणीकडे चाललेल्या शिवशाहीची व पाचगणीकडून वाईकडे निघालेल्या खाजगी बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 40 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत माहिती अशी की, आज दि. 9 रोजी दुपारी महाबळेश्वर येथील लग्न समारंभ उरकून एका खाजगी बसमधून वर्हाडी मंडळी पुण्याला निघालेली होती. दरम्यान, वाई-पाचगणी दरम्यानच्या पसरणी घाटात एका तीव्र वळणावर चालकांना अंदाज न आल्याने वाई बाजूकडून पाचगणीकडे निघालेल्या शिवशाहीला या खाजगी बसने समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत खाजगी बस पलटी झाली. दोन्ही बसमधील सुमारे 40 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पाचगणी व वाई पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींना वाई येथील सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. दरम्यान पसरणी घाटातील अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने घाटातून हलविण्याचे काम सुरु असून या अपघाताची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |