05:13pm | Feb 24, 2020 |
सातारा : वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे असे म्हणत संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे चारशे वर्षांपूर्वी वृक्ष जतनाचे महत्त्व लोकांना पटवून सांगितले होते. त्याचप्रमाणे ‘झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा’ यासाठी राज्यातील वनविभाग आग्रही आहे. असे असताना मात्र मुकवली मुर्हा येथील वनरक्षकानेच शेकडो झाडांवर कुर्हाड चालवून त्यांना मुठमाती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुकवली मुर्हा, ता. जावली येथील वनरक्षक मिरा कुटे यांनी येथील डोंगरउतारावर पावसाचे पडणारे पाणी जिरवण्यासाठी जेसीबीच्या माध्यमातून मोठ-मोठाल्ले खड्डे खोदले आहेत. मात्र हे खड्डे खोदत असताना अनेक मोठ्या वृक्षांची कत्तल केली असून ते तोडलेले वृक्ष खड्ड्यामध्ये माती टाकून गाडलेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे गाव जरी जावली तालुक्यात येत असले तरी ते महाबळेश्वरचाच एक भाग आहे. महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सेसिटीव्ह झोन (पर्यावरण संवेदनशील क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. असे असताना मुकवली मुर्हा येथेही मोठ्या प्रमाणावर जैवसंपदा आहे. त्यामुळे सातारा येथील वनविभाग येथील जैवसंपदेवर डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतो. असे असताना पाणी जिरवा, पाणी अडवा या अभियानाची अंमलबजावणी करीत असताना जावलीतील वनरक्षक मिरा कुटे यांनी जेसीबी व कुर्हाडीचा वापर करुन शेकडो झाडांची कत्तल केली आहे. तसेच या कत्तलीचा सुगावा लागू नये म्हणून कत्तल केलेली झाडे जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खड्डे काढून त्यामध्ये दफन केली आहेत. इतरवेळी नागरिकांनी झाडे तोडल्यास त्यांच्यावर वनविभागाच्या मार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र मुकवली मुर्हा येथे कुंपनानेच शेत खात शेकडो झाडांची कत्तल केलेली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक शेकडो झाडांची कत्तल करणार्या मिरा कुटे या वनरक्षिकेवर सातार जिल्हा वनविभागाने तत्काळ कारवाई करुन त्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी महाबळेश्वरमधील ज्येष्ठ पर्यावरणवादी बाळासाहेब उर्फ सूर्यकांत पांचाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेली आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |