12:30am | Jun 11, 2018 |
फलटण: प्रेम संबंधातून झालेल्या भांडणातून माझी तक्रार अगोदर का घेत नाही ? असे म्हणत सोबत आणलेली विषाची बाटली तोंडाला लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्रांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिल धनाजी निंबाळकर व कल्याण हनुमंत निंबाळकर दोघे रा. वाठार निंबाळकर ता. फलटण हे दुचाकीवरून जात असताना, गणेश गोविंद निंबाळकर रा.वाठार निंबाळकर ता. फलटण याने गाडी आडवी लावून अनिल व कल्याणला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यानंतर अनिल व कल्याण यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेश गोविंद निंबाळकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ही गोष्ट गणेश निंबाळकर याचे वडील गोविंद रामचंद्र निंबाळकर रा. वाठार निंबाळकर, यांना समजल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत, आमची तक्रार अगोदर घ्या, असे म्हणत सोबत आणलेली विषाची बाटली दोघां पिता-पुत्रांनी तोंडाला लावली, दरम्यान पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत त्या दोघांकडून विषाची बाटली हिसकावून घेतली, व दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला. तसेच याबाबत दोन्ही पार्टीवर परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. दरम्यान हा सर्व प्रकार प्रेमसंबंधातून घडला असून याबाबतची नोंद पोलीस स्टेशन डायरीला झालेली आहे. याबाबत अधिक तपास परीवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करीत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |