कराड : कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नाकातोंडाला लावण्यात येणार्या अँटीव्हायरस मास्कची उपलब्धता वाढवण्यात यावी, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली.
नवी दिल्ली येथे संसद भवन मध्ये 62 नंबरच्या सभागृहात बुधवारी आयुष मंत्रालयाच्या वतीने कोरोना व्हायरस संदर्भातील उपाय योजना तसेच मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी खासदारांची विशेष बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी काही विभागांचे खासदार, आयुष मंत्रायाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकी दरम्यान सध्या देशातील विविध शहरामध्ये कोरोना व्हायरसचा उपद्रव वाढू नये, या संसर्गाला पायबंध घालण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून कोणकोणत्या आवश्यक उपाय योजना केल्या जात आहेत याची माहिती खा.श्रीनिवास पाटील यांनी घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून नाकाला आणि तोंडाला लावायचे अँटी व्हायरस मास्क सध्या कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवावे, यासाठी अशा मास्क उत्पादकता मार्फत खात्रीने काही प्रयत्न करता येतील का, याबाबत सरकारने विचार विनिमय करावा अशी सूचना खा.पाटील यांनी मांडली.
याशिवाय संभाव्य आपत्ती व निर्मुलनाबाबत काही महत्वाच्या सुचनाही यावेळी त्यांनी मांडल्या. यावर सर्व विभागाच्या सचिवांना याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. भारत सरकारने कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठी अॅडवायजरी जाहीर केली असल्याची माहिती आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी दिली.
वनौषधींच्या उत्पादनासाठी शेतकर्यांना प्रेरीत करावे असेही सूचविण्यात आले. शेतकर्यांच्या मार्फत औषधी वनस्पतींचे उत्पादन, त्याची हमीभावाने खरेदी, साठवणूक आणि वितरण व्यवस्था सरकारने निर्माण केली पाहिजे. जंगलातून औषधी वनस्पती गोळा करण्यापेक्षा त्याची शेती केल्यास औषधी वनस्पतींचे उत्पादन वाढेल. शेतकर्यांना हमीभाव मिळू लागला की, अधिकाधिक उत्पादन देण्यासाठी ते कसोशीन प्रयत्न करतील. यासाठी आयुष मंत्रालयाने पुढकार घ्यावा अशी सूचना खा.पाटील यांनी केली.
या सुचनेची दखल घेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी दिले. या बैठकीत तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे ठरले.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |